Mayuri Atre is one of the participants of singing reality show. She is visually challenged. I have conducted her interview on my youtube channel ‘Gaargee’ on the occasion of Music day 2024. wish you all happy Music day 2024! and happy Yoga day 2024! below content is in Marathi language
It has youtube link https://youtu.be/mHYTTS0a_wk सर्वाना संगीत दिनाच्या मनःपूर्वक सूरमय शुभेच्छा! तसेच योगदिनाच्याही आरोग्यमय शुभेच्छा! संगीतदिनाचे औचित्य साधून Gaargee Youtube तर्फे गायिका मयुरी अत्रे हिची मुलाखत प्रक्षेपित करत आहे खाली दिलेली लिंक वापरून मुलाखत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा! Gaargee Youtube presents Interview with singer Mayuri Atre on the MusicDay2024. https://youtu.be/mHYTTS0a_wk पहिल्यांदा मयुरी अत्रे हिला ऐकले ते “सूर नवा ध्यास नवा” ह्या कार्यक्रमात. तिचा आवाज श्रवणीय आहेच. ती सुरेल गातेच. त्या कार्यक्रमातले परीक्षक तिचे तिच्या गाण्यातील कुशलतेबद्दल कौतुक करतच होते. पण ती जेव्हा तिच्या सादरीकरणासाठी मंचावर यायची तेव्हा माझ्या मनात एक समांतर विचारधारा सुरू व्हायची. ते विचार असायचे ती इथेपर्यंत पोहोचण्यासाठी अंधत्वाचे आव्हान ती पेलत असल्यामुळे तिला अधिकचे घ्यावे लागणारे कष्ट . भक्कम पाठिंबा आणि उत्तम मार्गदर्शन पुरवणारे तिचे पालक, गुरूजन आणि सर्व अभिष्टचिंतक. त्या सर्वांचे मनोधैर्य , कष्ट. अंधत्वाचे आव्हान पेलून सामान्य जगात समाविष्ट होता येते हे जितके खरे आहे तितकेच हेही खरे आहे की सगळ्यांनी स्विकारण्याआधी पालकांनी त्यांच्या बाळाला आणि स्वतः स्वतःला स्विकारणे आणि गरजेचे असतील तेते प्रयत्न करण्यासाठी सर्वार्थाने तयार होणे कितीतरी महत्त्वाचे असते. हे केवळ अंधत्वाचे आव्हान असतानाच नव्हे तर असे कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाताना लागू होईल. ह्या विचाराबरोबर मयुरीचा आणि तिच्या पालकांचा हा प्रवास बाकीच्यांना प्रेरणादायक आहे. तो youtube video च्या माध्यमातून मला सर्वांपर्यंत पोहोचवता येईल हे कळत होते. पण ते प्रत्यक्ष घडेल का याबाबत साशंकता होती. पण मयुरी आणि तिच्या पालकांनी ही मुलाखतीची कल्पना इतक्या सहजतेने सकारात्मकतेने उचलून धरली की मला खूपच आनंद झाला. आणि आज संगीत दिनाच्या निमित्ताने मयुरी अत्रे हिची मुलाखत Gaargee youtube channel वर प्रक्षेपित करता आली. हा संवाद ध्वनीमुद्रीत करताना मलाही खूप मजा आली. खरे तर आणखी खूप प्रश्न मनात आहेत ज्यांची मयुरीकडून उत्तरे ऐकायची उत्सुकता आहे पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आता इतकेच. धन्यवाद मयुरी! धन्यवाद मयुरीचे आई व बाबा तुम्हाला! मयुरीला follow करायचे असेल तर ह्या links वापरा https://www.instagram.com/mayuriatre?igsh=ZnhyMDlsZWltdHNv https://www.facebook.com/mayuri.atre.52?mibextid=ZbWKwL https://youtube.com/@mayuriatre4600?si=EEAMSo1sKY19Y-RS मला स्वतःचे कौतुक मी स्वतःच करणे कधीही मान्य नाही. पण अंधत्वासहीत जगणे शक्य असले तरी सोपे नक्कीच नाही. आज मी माझ्याच उदाहरणावरून हे नक्कीच समजून आहे की 100% अंधत्वाचे आव्हान घेऊन स्वावलंबी होण्यात माझ्या पालकांचा निर्धार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला मयुरी अत्रे हिचे कौतुक आहेच पण तिच्या पालकांप्रती मनात कृतज्ञताही आहे. शेवटी माझं नेहमीचं... Gaargee youtube channel अजून subscribe केलं नसेल तर कृपया subscribe करा! Video आवडला तर नक्की like करा! video अनेकजणांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून शक्य तेवढा share करा! ©️ Vedika Phadke 21-06-2024 Kohapur #Music Day #Mayuri_Atre #Gaargee_Youtube Regards, Vedika -- Disclaimer: 1. Contents of the mails, factual, or otherwise, reflect the thinking of the person sending the mail and AI in no way relates itself to its veracity; 2. AI cannot be held liable for any commission/omission based on the mails sent through this mailing list.. Search for old postings at: http://www.mail-archive.com/[email protected]/ --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AccessIndia" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To view this discussion on the web visit https://groups.google.com/a/accessindia.org.in/d/msgid/accessindia/CA%2BPmk0vCeofdMp5DMnwWiPYAoAOJxrnJQoUgC%2B984moQqR%3DWEA%40mail.gmail.com.
