<https://lh5.googleusercontent.com/-WcGh--SE7ow/UdzBzISE98I/AAAAAAAAy9k/e3Mpcg6RCCY/s1600/dahanu+ITDP+add.jpg>


On Wednesday, June 26, 2013 10:49:51 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
>
> 'आदिवासी विकास विभागात विकेंद्रीकरण करणार'
> [image: Facebook] 
> <http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm#>[image: 
> Google] 
> <http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm#>[image: 
> Twitter] <http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm#>
>  [image: ईमेलने पाठवा]
>
> - सकाळ न्यूज नेटवर्क
>
> मुंबई - आदिवासी विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील विविध 
> वस्तूंच्या खरेदीप्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खरेदीप्रक्रियेचे 
> विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून काही दिवसांतच आश्रमशाळांसाठी 7 
> हजार शिक्षकांची भरती करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड 
> यांनी दिली. मंत्रालयातील आपल्या दालनात ते पत्रकारांशी बोलत होते. 
>
> आश्रमशाळांतील शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी सामायिक परीक्षा बंद करण्याचा 
> विचार आहे. त्याऐवजी गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती करून आदिवासी विभागातील 
> अनुभवासाठी अतिरिक्‍त 10 गुण ग्रहित धरले जातील व काही दिवसांतच 7 हजार 
> शिक्षकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींच्या 
> आश्रमशाळांना यापुढे खुल्या बाजारातून शिधा खरेदी करण्याची पद्धतही बंद 
> करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांना यापुढे 
> खुल्या बाजारातून नव्हे; तर सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या माध्यमातूनच शिधा 
> खरेदी करावा लागणार आहे. यामुळे शिधा खरेदीतल्या अपहाराला मोठ्या प्रमाणात आळा 
> बसेल, असा दावा त्यांनी केला. यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी 
> आपली चर्चा झाली असून, पवारांनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले 
> आहेत. केंद्राकडे प्रस्ताव गेल्यास रेशनिंगच्या कोट्यात वाढ करण्याचे आश्‍वासन 
> पवार यांनी दिल्याची माहिती पिचड यांनी दिली. 
>
> गेल्या आठवड्यात सर्व आदिवासी आमदारांची बैठक पिचड यांनी बोलविली होती. या 
> वेळी आदिवासी भागात अनेक सिंचन प्रकल्प असतानाही पाण्याच्या टंचाईचा सामना 
> करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारच्या पाण्यावर आदिवासी कल्याणच्या हेतूने 
> रॉयल्टी आकारण्यात यावी, अशी मागणी बैठकीत आमदारांनी केली. आदिवासी भागातल्या 
> खनिज संपत्तीवर आदिवासी योजनांसाठी रॉयल्टी आकारली जाते. त्याच धर्तीवर 
> पाण्यावर देखील रॉयल्टी आकारावी आणि ही रॉयल्टी संबंधित पाणीपुरवठ्याचा लाभ 
> घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेने भरावी, अशी भूमिका अनेक आमदारांनी या 
> बैठकीत मांडली. यावर तातडीने निर्णय घेण्याची हमी आदिवासी विकास मंत्री मधुकर 
> पिचड यांनी दिली. 
>
> आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी नवीन इंग्रजी 
> शाळांऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या आश्रमशाळांमध्येच इंग्रजी शिक्षण 
> बंधनकारक करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
>
> Ref : http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm
>
> ------------------------------------------------------
>
>
> We hope 
> आश्रमशाळांसाठी 7 हजार शिक्षकांची भरती : Will give maximum job opportunity 
> to local tribal D ed / B Ed holders. 
>

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/69055baf-ddbc-4919-a087-693fd2364313%40googlegroups.com.


Reply via email to