" आदिवासी आरक्षण आणि राज्यघटना " --- 
'धनवार ' ही महाराष्ट्र राज्यातील एक छोटीसी जमात आहे , १९७१ साली यवतमाळ 
जिल्ह्यात या जमातीचे फक्त ९ जण आढळले , १९८१ साली मात्र त्यांची संख्या अचानक 
६९८०९ एवढी झालेली दिसते , परंपरागत आदिवासी जमातीमध्ये होणारा हा घुसखोरीचा 
प्रकार आहे हे उघड आहे , 'धनवार ' ही गोंड व कवर जमातीची उपशाखा आहे , 
मध्यप्रदेशातूल छोटा नागपूर या प्रदेशालगत असलेल्या बिलासपूर या भूतपूर्व 
संस्थानातील 
जमिनदारांचे जमिनजुमले जेथे होते, तो भूप्रदेश, म्हणजे धनवारांची मायभूमि होय 
, या जमातीला 'धनुहार ' असेही नाव आहे , 'धनुहार म्हणजे धनुर्धारी ' या जमातीत 
अंतर्विवाही पोटजमाती नाहीत , पण त्यांच्यात देवकावरून ( totem ) निर्माण 
झालेले कुलवर्ग ( septs ) असून ते परस्परांशी बेटीव्यवहार करतात , या 
कुलवर्गांची नावे बहुधा छत्तीसगडी बोलीतील शब्दांवरून तयार झालेली व 
क्वचितप्रसंगी गोंडीही आहेत , एखाद्या वनस्पतीच्या किंवा प्रण्याच्या नावावरून 
ही नावे रूढ झालेली आहेत , अशा कुळातील लोक ती वनस्पती तोडत नाहीत व तो प्राणी 
मारत नाहीत , त्यांच्यापैकी काही लोक शिकारी, शेतकरी किंवा कामकरी आहेत , 
काहीजण बांबूच्या चटया विणण्याचेही काम करतात , ठाकूरदेव ( शेतीचादेव ) 
दुल्हरदेवी ( कुलदेवी व भूमीता ) ही त्यांची प्रमुख आराध्यदैवते आहेत ! 
अर्थातच : सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या धनगर जातीसी धनवारांचा काहीही संबंध 
नाही, हे दोन समाज अगदी वेगवेगळे आहेत , शेळ्या मेंढ्या राखणारे धनगर 
महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत, नामसदृश्याखेरीज दोन्हीचा काहीही संबंध नाही , 
'धनवार ' ( अनुसूचित जनजाती ) 'धनगर ' ( अन्य मागासवर्गीय ) आणि आता धनगर अन्य 
मागासवर्गीयामध्ये न रहाता महाराष्ट्रात धनगर ही भटक्या जमातीच्या यादीत 
क्रमांक ३२ वर समाविष्ट केलेली जात आहे ! 'धनगरांना भटकी जमात ( क ) मध्ये ३. 
५ % आरक्षण आहे , महाराष्ट्रात आदिवासींच्या ४७ जमातींना ७% आरक्षण आहे ! 
धनवारांची दैवते : ठाकूरदेव आणि दुल्हरदेवी तर धनगरांची दैवते : खंडोबा आणि 
बाणाई ! धनवार व धनगर ह्या वेगवेगळ्या जाती - जमाती आहेत ! त्यांच्यात 
सामाजिक, सांस्कृतिक, वैवाहिक काहीही संबंध नाही ! केवळ नामसाधर्म्यावरून धनगर 
हे धनवार होऊ शकत नाहीत ! 

क्रमशः ७ ( क्रमशः सर्व लेख वाचल्यावर इतंभूत माहीती मिळून गैरसमज दूर होतात ) 
धन्यवाद ! कृष्णकांत भोजने , 
अध्यक्ष : आदिवासी साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र रजिः शाखा पुणेजिल्हा 
! जय आदिवासी !!!!!




On Thursday, July 10, 2014 11:10:50 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
>
>
>
> ---------- Forwarded message ----------
> From: Ravindra Talpe <ravita...@gmail.com>
> Date: Thu, Jul 10, 2014 at 2:41 PM
> Subject: Fwd:
> To: satish Lembhe <satishlem...@gmail.com>
>
>
>  
> Thanks & Regards,
> Ravindra U Talpe
> ==============================
> Cell: 98227 65531
> ==============================
>  
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f0803c88-ff93-4ec8-8483-27b7b9863795%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to