Feeling proud on progress ...appreciated Sachin and team...
On 02-Dec-2015 7:23 AM, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in>
wrote:

> || वारली चित्रकला उपक्रम – बातमी : २९ नोव्हेंबर २०१५ ||
>
> सध्या आदिवासी समाज अतिशय नाजूक वळणावरून जातो आहे. एकी कडे आपली नैसर्गिक
> साधन संपत्ती हळू हळू आपल्या हातून निसटते आहे, आदिवासी समाजाची असेलेली
> स्वायत्ता आणि आपली स्वावलंबन टिकविण्या साठी आदिवासी / बिगर आदिवासी /
> नेतृत्व/शासन इत्यादी मध्ये आदिवासी परंपरा विषयी जागरूकता होणे महत्वाचे आहे.
> त्या दृष्टीने आदिवासी अस्मिता, आपले पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक ओळख जतन
> करण्या सोबत व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घेवून समाजात रोजगार निर्मिती व्हावी
> यासाठी आदिवासींनी पुढाकार घेण्यासाठी विविध उपक्रम द्वारे जागरूकता करतो
> आहोत.
>
> आपले पारंपारिक ज्ञान जतन करून समाजात रोजगार निर्मिती साठी काही केलेले
> प्रयत्न आपल्या माहिती साठी
>
> १) चित्र फ्रेम बनवणे : आरा फ्रेम तर्फे मशीन सेटअप, व प्रत्याक्षिक याचे
> प्रशिक्षण वाघाडी येथे ४ सभासदांनी पूर्ण केले. लवकरच नवीन कलाकृती निर्मिती
> चालू केली जाणार आहे.  (10 Nov 2015)
>
> २) ठाणे रेल्वे स्थानक नुतनीकरण प्रकल्प : स्थाकानात पुलावर वारली चित्रकला
> काढणे या साठी रोटरी क्लब सोबत संजय पऱ्हाड यांनी पाहणी केलिय. बोलणे चालू
> आहे.  (27 Nov 2015)
>
> ३) आदिवासी पर्यटन : स्वित्झरलंड येथून हरीनी या आपल्या परिवारासोबत ५
> दिवसासाठी आदिवासी संस्कृती आणि कला यांचा अनुभव घेण्य साठी येत आहेत. त्यांना
> संदीप भोइर, संचिता सातवी हे मार्गदर्शन करणार आहेत.  (2 Dec to 7 Dec 2015)
>
> ४) आदि कला : या उप्रकम द्वारे कलेची आवड असणाऱ्या कलाकार, विद्यार्थी, युवा,
> महिला,बेरोजगार यांना आपली कलाकृती जगभरात पोचवून आर्थिक
> उन्नती साठी हातभार लावण्या साठी नोंदणीची सुरवात केली आहे, सगळ्यांना आवाहन
> करण्यात येते कि आपल्या कलाकारांना या उपक्रमात जोडावे. कलाकारांचे नाव , गाव,
> कलेचे नाव sms करा 0 9246 361 249
>
> ५) आपले हक्काचे संकेत स्थळ : आदिवासी कलाकृती आणि तयार केलेली विविध साधन
> सामग्री विक्री साठी स्वतः आदिवासींचे संकेत स्थळ लवकरच सुरु होते आहे  (
> www.warlikala.com) – Under Updation
>
> ६) मोठा विक्री संस्था  : आदिवासी कलाकृती आणि तयार केलेली विविध साधन
> सामग्री विक्री साठी विविध संस्था सोबत करार करण्यात आले आहेत , आणि चर्चा
> चालू आहेत. त्यात इंडिया कला, आर्ट बाजार, फ्लिपकार्ट, अमेझोन, नाप तोल,
>  पेटीएम, क्राफ्ट्सविला, स्टिफ कॉलर, आस्क मी , इत्यादी . अजून आणखीन काही
> जोडत आहेत
>
> ७) केरळ यथील एका मोठ्या हॉटेल च्या नुतनीकरण करून पूर्ण परिसरात वारली
> चित्रकला काढण्या साठी बोलणे चालू आहे. (अंदाजे १० कलाकार १ महिना काम करतील).
> तसेच अलिबाग येथील एका मोठ्या फार्म हाउस वर भिंतीवर चित्रकला या साठी
> मुंबईतील एका कंपनी सोबत बोलणे चालू आहे (अंदाजे ५ कलाकार एक आठवडा काम करतील).
>
> ८)  आगामी "राष्ट्रीय आदिवासी उत्सवा" मध्ये सहभागी : अंतराष्ट्रीय क्षेत्रात
> नामवंत व वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल पुरस्कार प्राप्त वारली चित्रकार अनिल वांगड,
> आदिवासी संस्कृती आणि परंपरा याचा अभ्यास आणि लिखाण करून अनेक पुस्तके
> प्रकाशित केलेलं संपत ठाणकर, जर्मन मध्ये पुस्तक प्रसिध्द केलेले आदिवासी
> छायाचित्रकार/चित्रकार/अभ्यासक मधुकर वाडू, यांना दिल्ली येथे आयोजित १२ ते १७
> फेब रोजी "नेशनल ट्रायबल फेस्टिवल“ मध्ये जाण्या आमंत्रणं व कार्यालयीन
> प्रक्रिया एकात्मिक आदिवासी विकास विभाग या तर्फे चालू करण्यात आली आहे .
>
> ९) वारली चित्रकला भौगोलिक उपदर्शन : हे पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक
> बौद्धिक संपदा जतन व्हावी या साठी आपण या कलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत
> भौगोलिक उपदर्शन म्हणून नोंद केली आहे, त्या बद्दल जागरुकते साठी लवकरच आपण एक
> कार्यक्रम घेण्याचे ठरवितो आहोत. अधिक माहिती कळविण्यात येयील
>
> १०) इंडिया कला तर्फे विविध कलाकृती ची छायाचित्रण साठी प्रशिक्षण देण्यात
> येणार आहे. भविष्यात आदिवासी कलाकारांना स्वतः छायाचित्रण करून त्यांची
> कलाकृती संकेत स्थळावर देता या साठी प्रयत्न करणार आहोत.
>
> ११) आर्ट बाजार चे संचालक आणि कलाकार यांच्या सोबत वाघाडी आणि गंजाड येथे
> बैठक पार पडली त्यात आर्त बाजार ची कार्यप्रणाली आणि आदिवासी चित्रकारांसाठी
> संधी यावर अधिक विस्तृतपणे चर्चा झाली. (11Nov 2015)
>
> गेली ९ वर्षे आयुश ग्रुप तर्फे आपण विविध पद्धतीने प्रयत्न करतो आहोत, पण
> असेच प्रयत्न प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक गाव गावात व्हावे या साठी
> प्रयत्न करूयात. समाजा साठी निस्वार्थ आणि सामाजिक भावनेतून आपले ज्ञान/कौशल्य
> उपयोगात आणत आणूया. (उदाहरण घेवून आपण आपल्या परीने आपल्या क्षेत्रात सामाजिक
> उपक्रम राबवावेत या साठी प्रसारित )  let's do it together!
>
> आयुश । आदिवासी युवा शक्ती
> www.adiyuva.in | www.warli.in
>
>
>
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBueWhx6twW7gkonwjvo2Vw1nd40RqvOTGkzM2Nh7uEdQA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBueWhx6twW7gkonwjvo2Vw1nd40RqvOTGkzM2Nh7uEdQA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CALvybp8c47XwifPs0vkzDrywkV0vjwiBqM1cUVTiFg5feWTHTw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to