एका संवेदनशील कवीच्या लेखणीतून पाझारलेली कविता म्हणजेच पहाडी फुलोरा
raju thokal is very sensitive poet
i congratulate him for his most awaited book of poem collection

2015-12-14 19:50 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in>:

> आदिवासी लेखणीतुन साकारतोय 'पहाडी फुलोरा'
>
> मराठी साहित्यात आज आदिवासी साहित्याची धुरा पेलणारे आदिवासी साहित्यिक
> निर्माण होत आहेत ही सर्वाधिक आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आदिवासींचं जगणं,
> दुःख, संस्कृती, परंपरा, जीवनशैली, निसर्गाशी असलेलं नातं, आव्हाने, स्थलांतर
> असे विविध पैलू आपल्या लेखणीतुन मांडत असताना अनेकांनी आदिवासींचा वाट्टेल तसा
> वापर केल्याचे दिसून येते. साहित्याची उंची तर वाढत होता, परंतु त्या
> ओझ्याखाली आदिवासी दाबला जात होता. त्याच्या पात्रातून नको त्या गोष्टी
> काल्पनिकपणे वदवून घेतल्या गेल्या. साहित्यिकांना पुरस्कार तर मिळाले पण
> ज्याच्यावर साहित्य लिहिले गेले त्याची संस्कृती मात्र बाटविण्याचे काम सर्रास
> केले जात होते आणि आहे.
>
> परिवर्तनाच्या चळवळीत वाहरू सोनवणे, तुकाराम धांडे, भुजंग मेश्राम, नजूबाई
> गावित, गोविंद गारे या काही आदिवासी विचारवंतांच्या कठोर मेहनतीतुन आदिवासी
> साहित्याने मराठी साहित्य विश्वात मुहूर्तमेढ रोवली. यांच्या सोबत अनेक
> साहित्यिक आज आपलं जगणं लेखणीच्या माध्यमातून जगासमोर परखडपणे मांडत आहेत. याच
> परिवर्तनवादी चळवळीतून राजू ठोकळ यांचा 'पहाडी फुलोरा' हा काव्यसंग्रह
> प्रकाशित होत आहे. DS media publishing ने प्रकाशनाची जबाबदारी उचलून ते विचार
> पुस्तकरुपाने साकारले आहेत.
>
> काव्य संग्रहातील विचारांना दृश्य रूप देत निखिल आहेर यांनी आपल्या
> कल्पकतेतून उत्कृष्ट असे मुखपृष्ठ बनविले आहे. मुकुंद साबळे, प्रशांत मोरे,
> विशाल गोंदके व इतर मित्र परिवार यांनी आपला खारीचा वाटा उचलत काव्य संग्रहाला
> आर्थिक हातभार लावला आहे. मयूर नवाळे यांनी आपल्या कामातून वेळ काढून कविता
> मुद्रित केल्याने त्यात जिवंतपणा आणला आहे.
>
> जे जगत आलोय, जे जगत आहे, जे जगावे लागणार आहे हे प्रामाणिकपणे मांडण्याचे
> काम कवीने केले आहे. दि.25 डिसेंबर 2015 रोजी लाडगाव, ता. अकोले, अहमदनगर येथे
> आदिवासी संस्कृती संवर्धन मेळाव्यात या काव्य संग्रहाचे प्रकाशन होत आहे. आपण
> हा पहाडी फुलोरा नक्की स्वीकाराल अशी अपेक्षा करतो.
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c7959688-dd9d-433f-a7ed-d544253bd532%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c7959688-dd9d-433f-a7ed-d544253bd532%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TDzfAvWmg%2B4--cy1tzyC276Ejt%3DtP1jAVJi1gfFC7-Qw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to