'आमचा गाव, आम्हिच सरकार' फ़िल्म ठरली
नासिक फ़िल्म फेस्टिवलचे आकर्षण-


         'पेसा कायदा, वन अधिकार आणि सक्षम ग्रामसभा' यांबद्दल माहिती 
देणाऱ्या विजयकुमार घोटे (नाशिक) दिग्दर्शित  'आमचा  गाव, आम्हिच सरकार' 
फ़िल्मचे 'अंकुर' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सन 2015 चा सर्वोत्कृष्ट 
चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला.
         सामजिक बांधीलकी जपणारी व सामाजिक प्रबोधन करणारी एकमेव फ़िल्म म्हणून 
प्रथम पसंती मिळणे आणि गौरव होणे ही उल्लेखनीय आणि प्रशंसनीय बाब आहे.
एका वेगळ्या थाटणीची फ़िल्म म्हणून गौरव झाला असून एका वेगळ्या विषयाला स्पर्श 
करून त्यांनी अप्रतिम दिर्गदर्शन/सादरीकरणाचा प्रत्यय देवून तमाम आदिवासी 
बांधवांचे, चाहत्यांचे तसेच उपस्थित फ़िल्म जगताचे मन जिंकले व वाहवा मिळवली.

🔹आदिवासी लोकशाही कशी असते..?
🔹भारताच्या लोकशाहिचा कशाप्रकारे वापर करायचा..?
🔹संविधानाची पुरेपूर अंमलबजावणी कशी करायची..?
🔹गाव प्रशासन कसे असावे..?
यावर चित्रीत ही परिपूर्ण फिल्म या फ़िल्म फेस्टिवलचा कुतुहलाचा आणि वेगळेपण 
जपणारा विषय ठरला. 
 वर्षभर केलेल्या छायाचित्रणामध्ये सदर टीमने गडचिरोली जिल्ह्यातील 
'मेंढालेखा' गावातील आदिवासी संस्कृती, त्याठिकाणचे होळी-दिवाळी यांसारखे 
सण-उत्सव, लग्नसराई, आदिवासी परंपरा-चालीरिती, बांबू कटाई, गाव व्यवस्थापन, 
दैनंदिन लोकजीवन या सर्व बाबींवर  प्रकाश टाकणारी व एक चांगला विषय मांडणारी 
एकमेव फ़िल्म म्हणून झालेला गौरव साऱ्या आदिवासी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट 
आहे. फ़िल्म फेस्टिवलच्या संयोजकांनी अशा चांगल्या सामाजिक  विषयांचे व सामाजिक 
बांधीलकी जपणाऱ्या विषयांचे नेहमीच स्वागत राहील असा विश्वास देवून 'श्री 
विजयकुमार घोटे' यांना सन्मानचिन्ह व स्मुर्तीचषक देवून गौरविण्यात आले.

          सदर 'आमचं गांव आम्हीच  सरकार' या  फिल्मच्या मेकिंगसाठी 
ग्रामस्थ-मेंढालेखा यांच्या परवानगी व सहकार्याने तसेच श्री. एकनाथ भोये सर, 
श्री. बाळासाहेब जाधव, श्री. प्रभाकर फसाळे, श्री.अतुल धांडे( यशोदा 
प्रतिष्ठान,अकोले), मानस चैरीटेबल फाउंडेशन, कार्तिक स्वामी आदिवासी 
बहुउद्देशीय मंडळ नाशिक या सर्वांच्या प्रयत्नाने अतिशय चांगली फ़िल्म झाली 
असून लवकरच ही फ़िल्म महाराष्ट्राच्या पेसा अंतर्गत येणाऱ्या 4500 ते 5000 
गावांमधुन दाखवली जाणार आहे विशेषतः महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेणार 
असल्याचा विश्वासही दर्शवला आहे. ही समस्त आदिवासी समाज्यासाठी अभिमानाची बाब 
आहे.

          त्यांच्या समस्त टीमला केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी व पुढील 
यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.


दिनेश भोईर🙏🏽🌿🌿
9860396300
वाडा, पालघर.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6d608c34-babf-4324-8d94-4522709c6c69%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to