चलो मुंबई मंत्रालय:
चलो मुंबई मंत्रालय:
चलो आझाद मैदान
चलो आझाद मैदान_
✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾
बुधवार,
दि.3/2/2016 रोजी
संपूर्ण देशभरात आदवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व आदिवासी 
संघट्नांकडून धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी 11 वा.उपस्थित 
रहावे.

⚫ सुशीलकुमार जहांगीर पावरा जि.प.शाळा आवाशी ता.दापोली जि.रत्नागिरी या शिक्षकावर 
सहा महिन्यापासून अन्याय चालु आहे.त्याची कागदपत्र मिळण्यासाठी माहितीच्या 
अधिकारात माहिती मागविलि एवढीच् चुकी होती
म्हणून त्यावेळच्या नंदलाल शिंदे या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याने चाकूने हल्ला 
केला सुशिल पावरा नंदुरबार जिल्ह्यातील व् आदिवासी आहे म्हणून दबाव आणला गेला 
.पोलीस स्टे.मध्ये गुन्हा दाखल केल्यावर शिंदे यास अटक करण्यात आली पण लगेच सोडून 
दिले उलट सुशील पावरास सीईओ यांनी उद्धट वागण्याचे कारण दाखवून निलंबित करण्यात 
आले मात्र शिंदे व् सीईओ एकाच् समाजाचे असल्याने शिंदे यास निलंबित न करता पावरा 
यांस त्रास देणे सुरु केले चार महिन्यापासून वेतन बंद केले आहे .कोकण आयुक्त यांचे 
कार्यालयावर पावरा यांनी उपोषणास बसल्यावर अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आयुक्तही 
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकू लागले.यांस न्याय मिळवून देण्यासाठी ......

⚫ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड़ तालुक्यातील चाफेड या गावात ग्रामसेवक असलेले 
सुनील ठोबा पावरा यांचा खून करुण मृतदेह झाडाला लटकवून फाशी घेतल्याचे दाखविण्यात 
आले होते मात्र पोस्टमार्टम मध्ये फाशी घेतली नसून खून केला असल्याचे स्पष्ट झाले 
अद्याप कोना अधिकाऱ्यांवर करवाई नाही यातही बदली साठी पावरा प्रयत्न करत असतांना 
अधिकाऱ्यांनी खुप त्रास दिला.
आदिवासी असल्याने जाणीवपूर्वक अन्याय झाला व् खून झाला या घटनेची cbi चौकशी करावी.

⚫ छत्तीसगड मधील समोर आलेली अत्यंत अमानुषतेचा कळस गाठणारी घटना म्हणजे अर्धसैनिक 
पोलिस दलाने 14 वर्षांवरील मूलींनी लग्न झाल्याचे दाखवावे स्तनात दूध नसेल तर 
नक्सलवादी ठरवायचे असा घाणेरडा प्रकार समोर आला पोलिसांनी जबरदस्तीने वस्र बाजूला 
करुण अशी कृत्य करुण आदिवासी मुलींसह महिलांवर ही अत्याचार केला आहे दिल्लीतील 
हिंदी दैनिक दलित आदिवासी दुनिया व्यतिरिक्त कोणीही मिडिया ने या घटनेची दखल घेतली 
नाही.
याची दखल घेण्यासाठी देशभर आंदोलन होणार असून 3 तारीख ही सुरुवात आहे .

⚫ मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बाकलपंड्या गावातील कामिनी अडमाचे आदिवासी 
मुलीवर चौघा नराधमानी बलात्कार करुण खून केला मात्र कोणाला अटक नाही की काही तपास 
नाही यावर आवाज उठविन्यासाठी ......

⚫महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील मुलांवर अन्याय होत आहेत या सर्व संदर्भात 
आन्दोलनाचे आयोजन केले असून सर्वानी उपस्थित रहावे.
बिरसाचे उलगुलान सुरु.........
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या कर्मभूमितून सुरु.....

चलो मुंबई,
आझाद मैदान,
थेट मंत्रालय
एक दिवस जमातीसाठी,
जमातीतील प्रत्येकासाठी,
उलगुलान जारी रहे,
जय जय जय आदिवासी..!
✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽✊🏾✊🏽

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/geegm5jt5mj31tn1nv3wi410.1454409271836%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to