Congratulations sirji ....
       wish you all the best to your team and your devotion ...
            can you arrange one or two days basic informational & skilled
free training workshop for tribal youth of Pune city ? If possible please
send me details...
                  yours  faithfully
        Annabhau  Shelke
  President of ADIM YOUNG  GLADIATORS

2016-05-30 23:21 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in>:

> || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० मे २०१६ ||
>
>
>
> आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांचे जगभर कौतुक होत असताना आपली नवीन पिढीची
> नाळ या आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवशक्यता आहे.
> तसेच आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य
> विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक
> कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया.
>
>
>
> त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक आणि सकारात्मक कार्य करणारे
> ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी
> प्रयत्न करूया.
>
>
>
> आपल्या माहिती साठी
>
>
>
> 1) वारली हाट निर्मिती चर्चा :
>
> - वारली चित्रकला उपक्रम आणि रोजगार निर्मिती आणि आदिवासी  युवकांची भूमिका
> या साठी जिल्हाधिकारी भेटीच्या पूर्व तयारी चर्चा २४ एप्रिल रोजी चारोटी येथे
> पार पाडली. चित्रकार, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, बेरोजगार युवा सहभागी झाले
> होते.
>
> - २५ एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी अभिजित भांगर यांच्या सोबत आयुश टिम चे
> प्रतिनिधी यांची चर्चा पार पडली. पारंपारिक ज्ञानाचा उपयोग करून (वारली
> चित्रकला) रोजगार निर्मिती विषयी आणि आयुश चे उपक्रम या संदर्भात एक तास चर्चा
> झाली.
>
>
>
> २) आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रदर्शन :
>
> २१ ते २३ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या "ग्लोबल एक्झिबिशन ओन सर्विसेस
> २०१६" - Global Exhibition  on Services 2016 मध्ये बौद्धिक संपदा विभागा
> (Intellectual Property India) तर्फे वारली चित्रकला प्रदर्शन आणि
> प्रात्यक्षिका साठी आयुश तर्फे संजय पऱ्हाड सहभागी झाले होते. अंतराष्ट्रीय
> पातळीवरील प्रदर्शनातील औद्योगिक कार्यक्रमाचा अनुभव मिळाला.
>
>
>
> ३) वारली चित्र एकत्रित मागणी :
>
> चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी चेन्नई येथील क्राफ्ट
> कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील चित्रांची निवड होवून लवकरच
> २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सदरची मागणी १००चित्रे पुरुष चित्रकारांचा गट
> संजय दा पऱ्हाड यांच्या नेतृत्वात तसेच १०० चित्रे महिलां चित्रकारांचा गट
> शर्मिला ताई घाटाळ यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहोत. (संपर्क करून सदर
> कार्यात सहभागी होवू शकता )
>
>
>
> ४) वारली चित्र विक्री साठी करार चर्चा :
>
> चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे साठी इन्फ़ीस्त्रायीद्स
> (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि संकेत आयुश भेटी साठी ३जून
> रोजी वाघाडी येथे येत आहेत. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या
> कंपनी तर्फे असेलेले उपक्रम या विषयी चर्चा होणार आहे.
>
>
>
> ५) वारली चित्र संस्कृती आणि परंपरा या विषयी चर्चा :
>
>  - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई
> (National Institute of Fashion  Technology) येथून प्रा निकिता आणि ८
> विद्यार्थी हे १ जून रोजी डहाणू येथे येत आहेत. येथे १० दिवस राहून विविध
> कलाकार/अभ्यासक/आयुश सोबत चर्चा आणि अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार केला
> जायील.
>
> - महाराष्ट्रातील आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी
> जीवन शैली, कला , संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड
> येथील आर एफ एस इंटरटेंटमेंट (RFS Entertentment) कंपनीच्या भारताच्या
> विभागाच्या एम डी श्रीमती वरुणा राणा यांनी २९ मे रोजी तलासरी येथे भेट देवून
> स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी येथे आयुश ला भेट
> देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच संपत दादा ठाणकर
> यांच्या सोबत चर्चा होणार आहे.
>
>
>
> ६) शासकीय पातळीवर आदिवासी कला अभ्यासक्रम निर्मिती :
>
> आदिवासी  कला आणि पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती
> अभ्यासक्रम निर्माण करण्या हेतू केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास
> विभाग  (Ministry of Skill Development and Entrepreneurship Development)
> तर्फे आयुश ला अभ्यास भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट  डहाणू - वाघाडी येणार
> आहे. सदर विषयी चर्चेत सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा
> (पहिली बैठक मुंबई येथे झाली होती). लवकरच दिल्ली कार्यालयातून तारीख कळवली
> जायील
>
>
>
> ७) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण :
>
> लाकडी वस्तू, कारागिरी, बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध
> संकेतस्थळावर विक्री साठी ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण
> करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून
> द्यावे. छाया चित्रन करून संकेत स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा
> संबधित मार्गदर्शन केले जायील. सदर उपक्रमात इच्छुक
> छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात.
>
>
>
> ८) कलाकृती विक्री :
>
> आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research &
> Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे
> "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या
> जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी
> ठेवू शकतात.
>
>
>
> ९) कलाकृती विक्री :
>
> आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत
> करार/नोंदणी  करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला,
> इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी
> कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या
> साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249).
>
> आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून
> आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक
> ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.  Lets do it together!
>
>
>
> १०) भिंती चित्र निर्मिती  :
>
> नाहूर येथील आय ओ टी इन्फ्रा या कार्यालयात भिंतीवर वारली चित्रकला शर्मिला
> ताई आणि त्यांची टीम ने कार्य पूर्ण केले. पुढच्या आठवड्यात बेंगलोर येथे नवीन
> घरात भिंतीवर चित्र काढण्या साठी मागणी आहे, इच्छुक कलाकारांनी संपर्क करावा
>
>
>
> ११) सहकार्य आणि सहभाग  :
>
> सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने
> सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय,
> इत्यादी) संपर्क करून सहभागी व्हावे
>
>
>
> # आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in)
> नोंदणी करून सहभागी होवू शकता
>
> आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक
> जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू
> शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश
> चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार
> घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता
> साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते
> त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया.  हेच आयुश आहे.
>
> Lets do it together!
>
>
>
> AYUSHonline team
>
> www.adiyuva.in | www.warli.in
>
> Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional
> knowledge and cultural Intellectual of Adivasi community!
>
>
>
> Aim of our Initiative through Warli Painting
>
> माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
>
> पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote
> Traditional knowledge through New technology
>
> चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its
> sustainable economy by employment generation
>
>
>
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c32ca124-24a2-4c17-a00e-bbaafaee5745%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c32ca124-24a2-4c17-a00e-bbaafaee5745%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC68%2BBCwr8TfNkqVkvg4YTESis3ZrTP6wxUXWBV7tDaGEuNrQw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to