*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑक्टॉम्बर २०१६ ||*

पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, निसर्ग, पर्यावरण, जैव वैविध्यता जतन करून
मानव तसेच सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे जग
आशेने बघत असताना. आज आदिवासी समाज अगदी नाजूक वळणावर आहे एकीकडे समाजाची
स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होते आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने
हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावते आहे, पिढी च्या पिढी हळू हळू
व्यसनातून नष्ट होते आहे, रोजगार डोळ्यासमोरून जात आहेत, हक्क डावलले जात
आहेत, योजना प्रत्येक्ष पोचत नाहीत, सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे, .... (यादी
खूप मोठी आहे)

असो, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास करून *प्रत्येक क्षेत्रात समाज हित जपून
एकमेकांना पूरक रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन/प्रत्येक्ष उपक्रम
सुरवात /सहकार्य /सहभागी होऊन आपण जर प्रयत्न केले आणि या समस्यांच्या मुळाशी
जाऊन कायमची उपाययोजना करून प्रत्येक्ष कृतीत उतरवली तर  नक्कीच समाजाला आपण
चांगले भविष्य देऊ शकतो. त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक
कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज
हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया.*

याच प्रेरणेने आपण गेली काही वर्षे आयुश या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.
*आयुश बद्दल २ शब्द* १९९९ पासून आयुश च्या संकल्पनेला सुरवात झाली. सामाजिक
चळवळींचा अभ्यास आणि निरीक्षण करून आदिवासी समाज प्राथमिकता ठेवून समाजातूनच
प्रयत्न व्हावे आणि त्यात युवकांचा सहभाग वाढवावा या साठी २००७ पासून विविध
कार्यक्रम घेणे चालू केले. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. आणि
सध्या वेग वेगळ्या माध्यमातून समाज जागृतीचे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या
माध्यमातून अधिक प्रभावी बनवतो आहोत.

आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान जतन (आदिवासी कला -वारली चित्रकला)
उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती),
तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. हीच मार्गदर्शक दिशा ठरवून आपण विविध उपक्रम
करतो आहोत.

माती : आपली सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता
करणे
पाणी : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य यांच्या साहाय्याने स्पर्धात्मक वाढवणे
चावूल : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे

या महिन्यातील काही घडामोडी

[चावूल]
१) *आदिवासी पारंपरिक कला अभ्यास* : वारली चित्राला चे प्रात्यक्षिक आणि
परंपरा समजून घेण्यासाठी विविध अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी भेट देतात किंवा
मेल द्वारे माहिती मागवतात. चेन्नई येथून निधी, बंगलोर निफ्ट येथून आशिष,
मुंबई निफ्ट येथून निवेदिता, शलाका आणि टीम यांना संजय पऱ्हाड यांनी
मार्गदर्शन केले. पुणे येथून निशा, मुंबईतील आर्किटेक्चर कॉलेज मधून फरीदा,
विरार येथून स्वाती लवकरच डहाणूला भेट देणार आहेत.

२) *आदिवासी जीवन संस्कृती दर्शन अनुभव* :
जर्मनी येथील क्रिस्ता आणि गुंटर न्यूयॉनहोफर हे जोडपे दर वर्षी भारतात येतात.
आदिवासी जीवनशैली आणि संस्कृतीजीवन जवळून बघण्यासाठी त्यांनी ओडिशा, उत्तर
पूर्वेकडील राज्यांना भेट दिली आहे. या वर्षी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील
आदिवासी परिसर अनुभवण्यासाठी आले आहेत. दिनांक ४ रोजी नाशिक येथून सुरवात करून
मोखाडा, जव्हार, विक्रमगड, कासा, तलासरी, डहाणू, पालघर, मनोर, खानवेल इत्यादी
परिसरातील पांड्याना भेट देऊन आदिवासी जीवन शैली बघणार आहेत. ४ दिवस अभिजित
पिलेना त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

३) *चित्रांची एकत्रित मागणी* : इंडिया कला मुंबई यांना तत्काळ एकत्रित १००
चित्रांची मागणी होती, पण सगळी चित्रे एका गुणवत्तेची आणि एका आकाराची २
दिवसात हवी असल्याने त्यांना पुरवता आले नाही.

४) *भेट वस्तू ची निर्मिती* : नोव्हेंबर मध्ये मुंबईत होणाऱ्या प्रदर्शन साठी
लाकडी वस्तू, बांबू च्या  वस्तू, जूट च्या वस्तू बनवून ठेवण्यासाठी सांगण्यात
आले आहे. विविध मध्यमातून कलाकारांना आवाहन करून त्यांच्या कलाकृती प्रदर्शनात
आणण्यासाठी कळवले आहे.

५) *शिव सह्याद्री ग्रुप* : मुंबईतील एक स्वयंसेवी गट दर वर्षी त्यांची दिवाळी
वेगळ्या पद्धतीने साजरे करतो. गेल्या वर्षी गड स्वच्छ मोहीम केली होती. या
वर्षी साखरे बंधारा आणि आदिवासी जीवनशैली जवळून बघून चंद्र नगर येथील पाड्यावर
गरजूना उपयोगी वस्तूंचे वाटप करून जण जागृतीचे पथ नाट्य करणार आहेत.
धान्य/कपडे/शैक्षणिक साहित्य/सायकल असे वाटप करणार आहेत. ६ रोजी अंदाजे ४० जण
मुंबईतून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत आहेत. संजय दा कार्यक्रमाचे
मार्गदर्शक आहेत. आपल्या पैकी कुणाला सहभागी व्हायचे असल्यास जरूर संपर्क
करावा.

६) *कुपोषण ग्रस्थाना सहकार्य* : मुंबईतील सामाजिक संस्था कुपोषणग्रस्थाना मदत
करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्ग्या मार्फत सायवन आणि परिसरातील २५ कुटुंबाना
साहाय्य केले जाईल. डॉ सुनील दा मार्गदर्शन करणार आहेत.

७) *पाड्यावर भेट* : भिवंडी येथील एक सामाजिक संस्था एक पाड्यावर भेट देऊन ५०
कुटुंबाना फराळ वाटप करण्यासाठी चौकशी करत होते. ६ रोजी ते भिवंडी जवळील
पाड्यावर भेट देतील

[पाणी]
८) *पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव* : रवींद्र नाट्य मंदिर, दादर,
,मुंबई येथे ८ ते १५ पर्यंत होणाऱ्या कला महोत्सवात आदिवासी कला जीवन प्रदर्शन
आणि प्रात्यक्षिक साठी आयुश ला जबाबदारी मिळाली आहे. त्यानुसार ११ ते १३ रोजी
(११ ते ६ पर्यंत) वारली चित्रकला चे प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन आणि ६ ते ८
वाजेपर्यंत आदिवासी पारंपरिक नृत्य चे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. मुंबईतील
वाचकांनी जरूर भेट देऊन आपल्या कलाकारांचे मनोबल वाढवावे. (या कार्यक्रमात
सहभागी होण्यासाठी पारंपरिक नृत्य गट, कलाकार यांनी संपर्क करावा)

९) *आदिवासी कलाकार* : आदिवासी कलाकारांचे प्रोफाइल मार्केटिंग साठी, जिथे
जिथे आदिवासी कलाकार सहभागी होतील त्याची माहिती एका ठिकाणी मिळावे या साठी
प्रयोग करतो आहोत.
दिल्ली - नॅशनल ट्रायबल कार्निवल २०१६ झालेल्या कार्यक्रमात विजय वाडु सहभागी
झाले होते
जपान - विविध कला संस्था मार्फत घेतल्या जाणाऱ्या वारली चित्रकला कार्यशाळा
येथे वायेडा सहभागी

१०) *स्थानिक पातळीवर कला बँक ची निर्मिती*
विविध गाव पाड्यावर विखुरलेले आदिवासी कलाकार, आणि कलाकृती सुरक्षित
साठविण्यासाठीच्या अडचणी लक्षात घेऊन. कलाकृती एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या
साठी आपण रेल्वे स्थानका जवळ (खंबाळे) आणि महामार्ग जवळ (वाघाडी) येथे कला बँक
ची निर्मित करण्यात येणार आहे. परिसरातील कलाकारांनी आपल्या कलाकृती आणि नमुना
कलाकृती जमा करून नोंदणी करावी. सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग
आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी उपयोगात आणावे. ज्या कलाकारांना आपल्या
कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना
प्रोडक्ट्स वाघाडी/खंबाळे येथील अयुश केंद्रात जमा करावेत. आदिवासी कलाकारांनी
सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय
मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे
अपेक्षित आहे.

११) *पुणे येथे कला विक्री केंद्र* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था
पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या
आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या
मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार नोंदणी करून
त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

१२) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*
वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ
आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले
करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका
नाही-
(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय ,
एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com,
artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com,
theartbazaar.in, BuffyFish, Unexplora,
(नोंदणी/करार चर्चा चालू आहे) : Puro Kraft, हस्त वेमा
->> यादी आणखीन वाढते आहे.

[माती]
१३) *पारंपरिक ज्ञान जतन प्रकल्प* : समाजात विखुरलेले पारंपरिक ज्ञान विविध
माध्यमातून संग्रहित करणे. या प्रकल्पात लिखाण, छायाचित्रीकरण, ध्वनी मुद्रण,
चित्रीकरण, संग्रह करून सहभागी होऊन आपल्या समाजाची बौद्धिक संपदा जतन
करण्यासाठी हातभार लावूया. इच्छुकांनी संपर्क करावा.

१४) *आदिवासी संस्कृती जागरण उपक्रम* : आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान
या बद्दल जागरूकता करण्यासाठी विविध माध्यमातून शाळा/कॉलेज/पाडा/गाव/शहर या
ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे. आपल्या परिसरात असे कार्यक्रम आयोजित करून
किंवा या साठी सहकार्य करून समाज जागृतीच्या कामाला हातभार लावण्यासाठी
इच्छुकांनी संपर्क करावा.

१५) *वारली हाट विकास समिती* : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत -
अजून उत्तर येणे बाकी आहे
 या संदर्भात लेखी निवेदन जमा केले आहे : जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प
अधिकारी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी विकास
विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी विकास विभाग
मुंबई,
सदर विषय प्रत्येक्ष चर्चा करून लेखी निवेदन जमा केले आहे : मंत्री/पालक
मंत्री - आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.  आयुक्त -
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण
निवेदन देऊन चर्चा केली आहे.

१६) आपल्या माहिती साठी *वारली चित्रकला - बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शनी
नोंदणी* : पारंपरिक आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन व्हावे या साठी
२०१० पासून सर्व कार्यालयीन प्रक्रिया करून २०१५ मध्ये बौद्धिक संपदा नोंदणी
पूर्ण झाली. या सगळ्या प्रक्रिये सगळे कार्य (आर्थिक आणि कार्यलयीन कामकाज )
आदिवासी युवकांनी स्वयंसेवी प्रेरणेने केले. (दुर्दैवाने कोणतीही शासकीय मदत
नाही)

१७) आदिवासी नेतृत्व परिचय : झारखंड मधील बिशुनपूर चे आमदार चामर लिंडा हे
देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधींना भेटत आहेत, आदिवासी प्रश्नावर राष्ट्रीय
पातळीवर लोकप्रतिनिधींचा दबाव गट तयार करण्यासाठी असा प्रयत्न गरजेचा आहे.
१९-२० नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधींशी त्यांची भेट
करून देण्यात येईल. चर्चेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा.

१८) आदिवासी विकास व्यवस्थापन पदव्यूत्तर अभ्यासक्रम : राष्ट्रीय ग्रामीण एवं
पंचायती राज संस्थान हैदराबाद मार्फत आदिवासी विकास व्यवस्थापन पदव्यूत्तर
दूरस्थ अभ्यासक्रम, ६ व्या ब्याच च्या प्रवेशा साठी जाहिरात आली आहे. एक
वर्षाचा अभ्यासक्रम असून यात आदिवासी विकासाचे विविध पैलू आणि प्रसाशन
व्यवस्था या बद्दल विस्तृत माहिती आहे. आदिवासी समाजा साठी रचनात्मक कार्य
करण्यासाठी इच्छुकांनी जरूर प्रवेश घ्यावा. आयुश टीम कडून सचिन सातवी यांनी या
अभ्यासक्रमात ५ व्या ब्याच ला प्रवेश घेतला होता पुढच्या महिन्यात अंतिम
परीक्षा आहे.

१८) *सहकार्य आणि सहभाग*:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने
सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय,
इत्यादी) संपर्क करून सहभागी होवू शकतात. सदर उपक्रमात इच्छुक
छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग साठी सहभाग घेवून सहकार्य करू शकतात.

 *#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* :
https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli
आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in)
नोंदणी करून सहभागी होवू शकता.

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक
जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू
शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच
आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून
पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ
समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी
योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. *आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा
उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !*
Lets do it together! | www.warli.in । ९२४६ ३६१ २४९
Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional
knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of our Initiative through Warli Painting
माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote
Traditional knowledge through New technology
चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its
sustainable economy by employment generation

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvDbvMeSnZUvwd7aG3u7XAQWGsPYVrz%3DK7iue1B1E1cPg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to