On Saturday, December 3, 2016 at 1:20:25 AM UTC+5:30, Warli Painting wrote:
>
> *|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० नोव्हेंबर २०१६ ||*
>
>  
>
> पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, निसर्ग, पर्यावरण, जैव वैविध्यता जतन 
> करून मानव तसेच सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे 
> जग आशेने बघत असताना. आज आदिवासी समाज अगदी नाजूक वळणावर आहे एकीकडे समाजाची 
> स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होते आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या 
> मार्गाने हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावते आहे, पिढी च्या 
> पिढी हळू हळू व्यसनातून नष्ट होते आहे, रोजगार डोळ्यासमोरून जात आहेत, हक्क 
> डावलले जात आहेत, योजना प्रत्येक्ष पोचत नाहीत, सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे, 
> .... (यादी खूप मोठी आहे)
>
>  
>
> असो, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास करून *प्रत्येक क्षेत्रात समाज हित जपून 
> एकमेकांना पूरक रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन/प्रत्येक्ष उपक्रम 
> सुरवात /सहकार्य /सहभागी होऊन आपण जर प्रयत्न केले आणि या समस्यांच्या मुळाशी 
> जाऊन कायमची उपाययोजना करून प्रत्येक्ष कृतीत उतरवली तर  नक्कीच समाजाला आपण 
> चांगले भविष्य देऊ शकतो. त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक 
> कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज 
> हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया.*
>
>  
>
> याच प्रेरणेने आपण गेली काही वर्षे आयुश या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. 
> *आयुश बद्दल २ शब्द* १९९९ पासून आयुश च्या संकल्पनेला सुरवात झाली. सामाजिक 
> चळवळींचा अभ्यास आणि निरीक्षण करून समाज हित प्राथमिकता ठेवून समाजातूनच 
> प्रयत्न व्हावे आणि त्यात युवकांचा सहभाग वाढवावा या साठी २००७ पासून विविध 
> कार्यक्रम घेणे चालू केले. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. आणि 
> सध्या वेग वेगळ्या माध्यमातून समाज जागृतीचे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या 
> माध्यमातून अधिक प्रभावी बनवतो आहोत. 
>
>  
>
> आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान जतन (आदिवासी कला -वारली चित्रकला) 
> उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), 
> तांदळाचे 
> पीठ, पाणी वापरले जाते. हीच मार्गदर्शक दिशा ठरवून आपण विविध उपक्रम करतो 
> आहोत. 
>
>  
>
> माती : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी 
> जागरूकता करणे 
>
> पाणी : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता वाढवणे 
>
> चावूल : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे 
>
>  
>
> या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी  
>
>  
>
> [चावूल]
>
> १) *आदिवासी पारंपरिक कला अभ्यास* : वारली चित्राला चे प्रात्यक्षिक आणि 
> परंपरा समजून घेण्यासाठी विविध अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी भेट देतात किंवा 
> मेल द्वारे माहिती मागवतात. या महिन्यात बोरिवली हुन भेट वस्तू निर्मिती त काम 
> करणाऱ्या जास्मिन शाह, दिल्ली येथील फॅशन टेकनॉलॉजितले तुषार जैन, चित्रकलेतील 
> मुंबईतून स्नेहल, जे जे कला महाविद्यालयातील हर्षद पदथारे यांनी भेट दिली 
> त्यांना खंबाळे येथे संजय दा पऱ्हाड यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील 
> आर्किटेक्चर कॉलेज मधून फरीदा, विरार येथून स्वाती लवकरच डहाणूला भेट देणार 
> आहेत. 
>
> हर्षद प्रोफेशनल छायाचित्रकार असून आयुश साठी छायाचित्रीकरण करून देण्यासाठी 
> सहकार्य करणार आहेत. 
>
>  
>
> २) *नवीन इमारतीत भिंतीवर चित्रकला* : 
>
> - नाशिक येथील एकता ग्रीन वीला यांच्या नवीन बांधलेल्या इमारतीत मोठ्या 
> आकाराची २४ चित्रे काढण्यासाठी चौकशी आली आहे, चर्चा चालू आहे. निश्चित 
> झाल्यावर काही कलाकार नाशिक येथे जाऊन ते पूर्ण करतील 
>
> - केरळ मधील एका मठात मोठ्या भिंतीवर वारली चित्र काढण्यासाठी चौकशी आली आहे, 
> चर्चा चालू आहे. निश्चित झाल्यावर काही  कलाकार तेथे जाऊन पूर्ण करतील 
>
> - मुंबईतील स्वयंसेवी संस्था विविध कार्यशाळा तयार करतात त्यांना भिंतीवर 
> वारली चित्र काढण्यासाठी चौकशी आली आहे. 
>
>  
>
> ३) *आदिवासी जीवन संस्कृती दर्शन अनुभव* : 
>
> - जर्मनी येथील क्रिस्ता आणि गुंटर न्यूयॉनहोफर हे जोडपे दर वर्षी भारतात 
> येतात. आदिवासी जीवनशैली आणि संस्कृतीजीवन जवळून बघण्यासाठी त्यांनी ओडिशा, 
> उत्तर 
> पूर्वेकडील राज्यांना भेट दिली आहे. या वर्षी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील 
> आदिवासी परिसर अनुभवण्यासाठी आले आहेत. दिनांक ४ रोजी नाशिक येथून सुरवात करून 
> मोखाडा, जव्हार, विक्रमगड, कासा, तलासरी, डहाणू, पालघर, मनोर, विक्रमगड, खानवेल 
> इत्यादी परिसरातील पांड्याना भेट देऊन आदिवासी जीवन शैली अनुभवली. ४ दिवस 
> अभिजित पिलेना त्यांना मार्गदर्शन केले. 
>
> - फ्रांस येथून श्री मायकल फेणेलुक्स हे निवृत्त प्राध्यापक (जागतिक 
> अर्थव्यवस्था), आणि त्यांच्या पत्नी निवृत्त करियर मार्गदर्शक हे २०११ पासून 
> डहाणू परिसरात आदिवासी संस्कृती आणि जीवनशैली अनुभवण्यासाठी येतात. तसेच जग 
> भरतील आदिवासी कलाकृती अभ्यासणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे. संजय दा पऱ्हाड 
> यांच्या वारली चित्रांचे प्रदर्शन ते फ्रांस मध्ये प्रदर्शन दार वर्षी भरवतात 
> आणि आदिवासी संस्कृती आणि परंपरा विषयी तेथील नागरिकात जागरूकता/प्रसार करतात. 
> ८ डिसेंबर ला १० दिवसांसाठी ते डहाणू येथे आयुश कडे येत आहेत. (२०११ वाघाडी 
> येथील भेटी दरम्यान चे त्यांचे अनुभव येथे बघता येतील - 
> https://youtu.be/wM0L0TMP3fo)
>
>  
>
> [पाणी] 
>
> ४) *पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव* : रवींद्र नाट्य मंदिर, दादर, मुंबई 
> येथे ८ ते १५ पर्यंत होणाऱ्या कला महोत्सवात आदिवासी कला जीवन प्रदर्शन आणि 
> प्रात्यक्षिक साठी आयुश कडून ११ ते १३ रोजी (११ ते ६ पर्यंत) वारली चित्रकला 
> चे प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन आणि ६ ते ८ वाजेपर्यंत आदिवासी पारंपरिक नृत्य 
> चे प्रात्यक्षिक दिले. 
>
> - गंजाड येथील युवकांनाच नृत्य पथक, करडन येथील नृत्य पथक यांनी तारपा, टिपरी, 
> धुमस्या, कामडी, डाक भगत, मांदळ इत्यादी नृत्य प्रकार यांचे प्रात्यक्षिक 
> प्र्रेक्षनकांचे आकर्षण ठरले होते. 
>
> - प्रशस्थ हॉल मध्ये वारली चित्रांमधून सामाजिक जागरूकता करण्यासाठी संपत 
> ठाणकर गुरुजींच्या कलाकृतींचे प्रदर्शन होते. मानवी मूल्य, पर्यावरण, निसर्ग, 
> परंपरा, संस्कृती, स्थानिक इतिहास, सध्याच्या आदिवासी समाजाचे अस्तित्वाचे 
> प्रश्न या विषयी ची मोठ्या आकाराची अंदाजे ५० चित्र आणि त्यांचे सविस्तर 
> मार्गदर्शन सगळ्यांना खिळवून ठेवत होते. मुंबईतील माणसांसाठी एक पर्वणीच होती 
> अश्या आशयाचे अनेक अभिप्राय नोंद वहीत मिळाले. 
>
> - संदीप दा भोईर यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण दिले, विविध वयोगटातील 
> इच्छुकांनी सहभाग घेतला. 
>
> - शर्मिला ताई घाटाळा यांनी प्रात्यक्षिक दिले, अनेकांनी त्यांच्या सोबत 
> चित्राचा सराव करून चित्र काढायचा प्रयत्न केला. 
>
> - अमित दा यांनी विक्री साठी कलाकारांनी जमा केलेल्या विविध कलाकृती विषयी 
> माहिती दिली,  उत्सुकता म्हणून बघण्यासाठी गर्दी होत होती. 
>
> पु ल देशपांडे अकॅडमी कडून खूप चांगले सहकार्य मिळाले. या उपक्रमाच्या चौकशी 
> च्या प्राथमिक चर्चे दरम्यान आयुश तर्फे प्रांजन राऊत, बबलू वाहुत, चेतन 
> गुरोडा, प्रकाश भोईर, संजय पऱ्हाड तसेच इत्तर कारागीर सहभागी झाले होते
>
> या उपराक्रमात तलासरी, डहाणू, पालघर, जव्हार, विक्रमगड तालुक्यातून ५२ 
> कलाकार सहभागी झाले होते. अभिजित दा पिलेना यांनी पूर्ण वेळ प्रबंधक म्हणून 
> दायित्व घेतले. सोबत बबलू वाहुत यांनी परिवारासोबत भेट देऊन सहकार्य केले. 
> मुंबईतील हजारो माणसांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आदिवासी जीवनशैली जाणून 
> घेतली. आदिवासी जीवनसंस्कृती, समाज, पारंपारिक ज्ञान, जीवन मूल्य या विषयी 
> शहरी माणसात जागरूकता करण्यासाठी हा कार्यक्रम कामी आला.  पु ल देशपांडे 
> अकॅडमी कडून खूप चांगले सहकार्य मिळाले. प्राथमिक चर्चे दरम्यान आयुश तर्फे 
> प्रांजन राऊत, बबलू वाहुत, चेतन गुरोडा, प्रकाश भोईर, संजय पऱ्हाड तसेच 
> इत्तर कारागीर सहभागी झाले होते. (कार्यक्रमातील छायाचित्रे येथे बघू शकता-  
> https://www.facebook.com/media/set/?set=a.1139383049448621.1073741858.122481367805466&type=1&l=ddc255d37e
>  
> )
>
>  
>
> ५) *आदिवासी कलाकार* : आदिवासी कलाकारांचे प्रोफाइल मार्केटिंग साठी, जिथे 
> जिथे आदिवासी कलाकार सहभागी होतील त्याची माहिती एका ठिकाणी मिळावे या साठी 
> प्रयोग करतो आहोत. आपल्या माहितीत असे काही कार्यक्रम/कलाकार व्हिजिट आल्यास 
> जरूर कळवावे, आपण प्रसारित करूया  
>
> दिल्ली - सांस्कृतिक मंत्रालय तर्फे राष्ट्रीय संसकृतिक महोत्सवात विजय वाडु 
> सहभागी झाले होते १५ ते २३ ऑकटोम्बर 
>
> जपान - टोकियो येथील गाकुगेयी विद्यापीठ आणि इनीवाशिरो यथील यामागाटा शाळेत 
> व्याख्यान आणि तेथील पुरातत्व संस्कृतीचा अभ्यास करून त्यावर वारली चित्र 
> काढण्यासाठी तुषार वायेडा, मयूर वायेडा ५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जपान ला 
> गेले होते.    
>
>  
>
> ६) *स्थानिक पातळीवर कला बँक ची निर्मिती*
>
> विविध गाव पाड्यावर विखुरलेले आदिवासी कलाकार, आणि कलाकृती सुरक्षित 
> साठविण्यासाठीच्या अडचणी लक्षात घेऊन. कलाकृती एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या 
> साठी आपण रेल्वे स्थानका जवळ (खंबाळे) आणि महामार्ग जवळ (वाघाडी) येथे कला बँक 
> ची निर्मित करण्यात येणार आहे. परिसरातील कलाकारांनी आपल्या कलाकृती आणि नमुना 
> कलाकृती जमा करून नोंदणी करावी. सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग 
> आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी उपयोगात आणावे. ज्या कलाकारांना आपल्या 
> कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना 
> प्रोडक्ट्स वाघाडी/खंबाळे येथील अयुश केंद्रात जमा करावेत. आदिवासी कलाकारांनी 
> सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय 
> मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे 
> अपेक्षित आहे.  
>
>  
>
> ७) *पुणे येथे कला विक्री केंद्र* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था 
> पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या 
> आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या 
> मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार नोंदणी करून 
> त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.
>
>  
>
> ८) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया* 
>
> वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ 
> आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले 
> करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका 
> नाही-
>
> (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , 
> एक्स्पोर्ट्स 
> इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, 
> greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, 
> BuffyFish, Unexplora, 
>
> (नोंदणी/करार चर्चा चालू आहे) : Puro Kraft, हस्त वेमा 
>
> ->> यादी आणखीन वाढते आहे. 
>
>  
>
> [माती]
>
> ९)*संयुक्त राष्ट्र संघ च्या कार्यक्रमात सहभाग* : संयुक्त राष्ट्र संघा 
> तर्फे जागतिक आदिवासी विषयावर नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयुश 
> तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनील पऱ्हाड यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज भरण्यात 
> आला आहे. कार्यक्रम पुढील प्रमाणे . 
>
> 16th session of the Permanent Forum on Indigenous Issues (24 April – 5 May 
> 2017) - न्यूयॉर्क 
>
> 10th session of the Expert Mechanism on the Rights of Indigenous Peoples 
> (19 – 23 June 2017) - जिनेव्हा 
>
> निवड झाल्यास पुढील विषयावर प्रेझेन्टेशन सादर करण्यात येईल (जागतिक आदिवासी 
> समाजाला जोडणारा दुवा मजबुती साठी प्रयत्न)
>
> - पारंपरिक ज्ञान जतन करून रोजगार निर्मितीचे उपक्रमातून आर्थिक स्वावलंबन व 
> सांस्कृतिक संपदा टिकविणे 
>
> - आदिवासी समाज काल, आज आणि उद्या : भारतातील आदिवासी समाजा समोरील आव्हाने 
> आणि तरतुदी 
>
> सदर विषयावर काही इनपूट आणि आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे. 
>
>  
>
>  
>
> १०) *पारंपरिक ज्ञान जतन प्रकल्प* : समाजात विखुरलेले पारंपरिक ज्ञान विविध 
> माध्यमातून संग्रहित करणे. या प्रकल्पात लिखाण, छायाचित्रीकरण, ध्वनी मुद्रण, 
> चित्रीकरण, संग्रह करून सहभागी होऊन आपल्या समाजाची बौद्धिक संपदा जतन 
> करण्यासाठी हातभार लावूया. इच्छुकांनी संपर्क करावा. 
>
>  
>
> ११) *आदिवासी संस्कृती जागरण उपक्रम* : आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान 
> या बद्दल जागरूकता करण्यासाठी विविध माध्यमातून शाळा/कॉलेज/पाडा/गाव/शहर या 
> ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे. आपल्या परिसरात असे कार्यक्रम आयोजित करून 
> किंवा या साठी सहकार्य करून समाज जागृतीच्या कामाला हातभार लावण्यासाठी 
> इच्छुकांनी संपर्क करावा. 
>
>  
>
> १२) *वारली हाट विकास समिती* : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत - 
> अजून उत्तर येणे बाकी आहे 
>
>  या संदर्भात लेखी निवेदन जमा केले आहे : जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प 
> अधिकारी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी 
> विकास विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी 
> विकास विभाग मुंबई, 
>
> सदर विषय प्रत्येक्ष चर्चा करून लेखी निवेदन जमा केले आहे : मंत्री/पालक 
> मंत्री - आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.  आयुक्त - 
> आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण 
> निवेदन देऊन चर्चा केली आहे. 
>
>  
>
> १३) आपल्या माहिती साठी *वारली चित्रकला - बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शनी 
> नोंदणी* : पारंपरिक आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन व्हावे या साठी 
> २०१० पासून सर्व कार्यालयीन प्रक्रिया करून २०१५ मध्ये बौद्धिक संपदा नोंदणी 
> पूर्ण झाली. या सगळ्या प्रक्रिये सगळे कार्य (आर्थिक आणि कार्यलयीन कामकाज ) 
> आदिवासी युवकांनी स्वयंसेवी प्रेरणेने केले. (दुर्दैवाने कोणतीही शासकीय मदत 
> नाही)
>
>  
>
> १४) आदिवासी नेतृत्व परिचय : झारखंड मधील बिशुनपूर चे आमदार चामर लिंडा हे 
> देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधींना भेटत आहेत, आदिवासी प्रश्नावर राष्ट्रीय 
> पातळीवर लोकप्रतिनिधींचा दबाव गट तयार करण्यासाठी असा प्रयत्न गरजेचा आहे. १९ 
> नोव्हेंबर रोजी केळवा येथील बिरसा मुंडा जयंती, २० ला कासा येथील आदिवासी 
> क्रांतिवीर जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गर्शन केले. तसेच पालघर 
> जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींची भेट करून दिली गेली. २१ रोजी नाशिक 
> येथील कार्यकर्त्यांशी, २२ रोजी पुणे येथे कार्यकर्त्यांशी बैठक झाली. काही 
> दिवसांनी त्यांना तेलंगणा मधील आदिवासी लोकप्रतिनिधींशी भेट करून देण्यात 
> येईल. 
>
>  
>
> १५) आदिवासी विकास व्यवस्थापन पदव्यूत्तर अभ्यासक्रम : राष्ट्रीय ग्रामीण एवं 
> पंचायती राज संस्थान हैदराबाद मार्फत आदिवासी विकास व्यवस्थापन पदव्यूत्तर 
> दूरस्थ अभ्यासक्रम, ६ व्या बॅच च्या प्रवेशा साठी जाहिरात आली आहे. एक 
> वर्षाचा अभ्यासक्रम असून यात आदिवासी विकासाचे विविध पैलू आणि प्रसाशन 
> व्यवस्था या बद्दल विस्तृत माहिती आहे. आदिवासी समाजा साठी रचनात्मक कार्य 
> करण्यासाठी इच्छुकांनी जरूर प्रवेश घ्यावा (प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख 
> ३० नोव्हेंबर होती). आयुश टीम कडून सचिन सातवी यांनी या अभ्यासक्रमात ५ व्या 
> ब्याच ला प्रवेश घेतला आहे. २३ डिसेंबर ला अंतिम परीक्षा आहे. 
>
> १६) *इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - "वारली 
> चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती* 
>
> प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या 
> बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली चित्र).  सदर पाठ मध्ये उल्लेख 
> आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, आदिवासी समाजात असेलेल 
> स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र 
> राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन मंडळ, आदिवासी संशोधन व 
> प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद गारे) यांचे वारली 
> चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. अजून उत्तर मिळाले नाही
>
>  
>
> 17) *शासकीय पातळीवर आदिवासी कला अभ्यासक्रम निर्मिती* : आदिवासी  कला आणि 
> पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती अभ्यासक्रम निर्माण 
> करण्या हेतू केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास विभाग  (Ministry of 
> Skill Development and Entrepreneurship Development) तर्फे आयुश ला अभ्यास 
> भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट  डहाणू - वाघाडी येणार आहे. सदर विषयी चर्चेत 
> सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा (पहिली बैठक मुंबई येथे 
> झाली होती). लवकरच दिल्ली कार्यालयातून तारीख कळवली जायील
>
> 18) दिनांक ९ डिसेंबर २०१५ रोजी पुणे MSCERT येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक 
> संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) यांच्या स्थरावर आदिवासी बोली भाषा 
> साहित्य प्रमाणीकरण समिती ची पहिली बैठक  पार पडली. परिषदेने २०१५-१६ या 
> वर्षात महाराष्ट्रातील आदिवासी बोली भाषा बोलणाऱ्या १६ जिल्ह्यातील १० आदिवासी 
> बोली भाषांची निवड करून त्या भाषांमध्ये "ओढ्या काठी" व "खेळच खेळ" या दोन 
> शीर्षकांची निर्मिती करून अनुवाद केला आहे. हि दोन शीर्षके १६ जिल्ह्यातील 
> शाळांना पुरवली जाणार आहे. पुस्तक छपाई पूर्वी हे साहित्य आदिवासी बोली भाषा 
> प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करण्यासाठी समितीची सभा अयॊजित केली होती. अजून 
> पुढील प्रक्रियेविषयी उत्तर अपेक्षित आहे
>
> समिती सहभागी झालेले सदस्य : सीताराम मंडाले, सचिन सातवी, सुनील गायकवाड, रमजान 
> गुलाब तडवी, सुभाष मेंगाळ, देविदास हिंदोळे, जितेंद्र सुळे, सी के पाटील, वनमाला 
> पवार, लहू गांगड. 
>
> पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १० बोली भाषा : वारली, भिली, पावरी, मावची, 
> निहाली, परधान, गोंडी, कोलामी, कोरकू, कातकरी.
>
> १9) *सहकार्य आणि सहभाग*:
>
> सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने 
> सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय,
> चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर, आर्थिक साहाय्य, नवीन 
> आयडिया देणे, संपर्क वाढविणे, जाहिरात करणे, इत्यादी)  
>
>  
>
>  *#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* 
> : https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli
>
> आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी 
> करून सहभागी होवू शकता. 
>
>  
>
> आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक 
> जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू 
> शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच 
> आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून 
> पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ 
> समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी 
> योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. *आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा 
> उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !*
>
> Lets do it together!   
>
>  
>
> AYUSHonline team
>
> www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९ 
>
> Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional 
> knowledge and cultural Intellectual of Adivasi community!
>
>  
>
> Aim of our Initiative through Warli Painting
>
> माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
>
> पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote 
> Traditional knowledge through New technology
> चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its 
> sustainable economy by employment generation 
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/241fdadd-0c7a-400c-9736-06e6bdb66c97%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to