sir / madam,

pls forward information about warli painting workshops in thane district

regards,

Madhura P. Rewale


________________________________
From: adiy...@gmail.com <adiy...@gmail.com> on behalf of Warli Painting 
<i...@warli.in>
Sent: Saturday, June 3, 2017 12:54 AM
To: AYUSH google group
Subject: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ ||

*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ ||*

जोहार !
आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन करून 
शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि गेल्या 
हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन जीवनशैलीत 
प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या उज्वल 
भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !

एके काळाचा स्वालंबी असलेला आदिवासी समजा अगदी नाजूक वळणावर आहे. पारंपारिक ज्ञान, 
सांस्कृतिक संपदा, स्वायत्त अर्थव्यवस्था मजबुतीकरणाची त्वरित गरज लक्षात घेता 
समाजातूनच पुढाकार घेणारी व्यवस्था तयार करण्याच्या हेतून युवकांनी २००७ पासून 
सोशियल नेट्वर्किंग द्वारे प्रयत्न चालू केले. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी 
केली, आणि सध्या आपल्या सहकार्याने कार्य चालू आहे. युवकांची उर्जा, ज्ञान, 
कौशल्य, एकत्रित रित्या सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी उपयोगात आणून आदिवासी 
सशक्तीकरण विषयी जागरूकते साठी आयुश प्रयत्नशील.

आपण पारंपरिक ज्ञान जतन करून आर्थिक स्वावलंबन मजबुतीसाठी रोजगार निर्मिती चे 
उपक्रम (आदिवासी कला जतन - वारली चित्रकला) राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र 
काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. अगणित पिढ्यानपासून 
जतन केलेले हे ज्ञान फक्त चित्रा पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक जीवन, शाश्वत 
विकासाला आदर्श दिशा म्हणून त्या विषयी जागरूकता आणि विविध कल्पक प्रयत्नातून 
रोजगार निर्मिती चे प्रयत्न चालू आहेत.

*मार्गदर्शक तत्व* -
माती (लाल माती, गेरू – सांस्कृतिक ओळख) : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक 
ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करून प्रसार करणे
पाणी (तंत्रज्ञान आणि गती) : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता 
वाढवणे
चावूल (उर्जा आणि स्वावलंबन) : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन 
मजबूत करणे

या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी

[अदिकला]
*१) पॅरिस येथे भारतीय आदिवासी कला प्रदर्शन - वारली चित्रकला* : गंजाड येथील 
नामवंत, हुशार, मेहनती बंधू तुषार आणि मयूर वायेडा हे सध्या पॅरिस येथील 
प्रदर्शनात वारली चित्रकला विषयी जागरूकता करत आहेत, हे प्रदर्शन १९ जून पर्यंत 
चालणार आहे. आताच ते जपान येथील पारदर्शनात पण सहभागी झाले होते. आपल्या परिचयात 
कुणी पॅरिस परिसरात असल्यास जरूर भेट द्यायला सांगावे. ठिकाण : Salon Du Patheon

*२) जर्मनी येथे वारली चित्रकलेचे प्रदर्शन* - गेल्या कित्त्येक वर्ष पासून वारली 
चित्रकलेच्या आकर्षणामुळे भारतात येत असलेले जर्मनी चे निवृत्त प्राचार्य लवकरच 
जर्मनी येथे वारली चित्रकलेचे प्रदर्शन भरवत आहेत, या पूर्वी हि त्यांनी संजय दा 
यांची चित्रांचे प्रदर्शन जर्मनीत भरवले होते. या वेळेस ३ कलाकार जर्मनी ला जाणार 
आहेत (सविस्तर माहिती कळविण्यात येईल)

३) *CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक* : भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम 
यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक प्रस्थाव सादरीकरण बैठक 
मुंबईच्या कार्यालयात झाली. सध्या प्राथमिक प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. ऑगस्ट 
मध्ये पुढील उच्च स्थरीय बैठक होणार आहे त्यात निर्णय होईल. जर हा प्रस्थाव मान्य 
झाल्यास ३ वर्षासाठी रोजगार निर्मितीच्या उपक्रमासाठी आयुश ला सहकार्य दिले जणार 
आहे

*४) प्रदर्शन : वस्त्र मंत्रालया च्या भौगोलिक उपदर्शनी चे दिल्ली येथे प्रदर्शन* -
प्रथमच वस्त्र मंत्रालयाच्या टेक समिती (“TEXTILES COMMITTEE”) तर्फे देशभरातील 
नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनाचे प्रदर्शन १ ते १५ मे दरम्यान दिल्ली येथे दिल्ली हाट 
येथे आयोजित करण्यात आले होते. आयुश तर्फे या प्रदर्शनात ४ कलाकार सहभागी झाले 
होते. राजेश दा रडे (आलोंडे, विक्रमगड तालुका), जाणू दा रावते (रायतली, तालुका 
डहाणू), विजय दा वाडू (गांजाड, तालुका डहाणू), कमलेश दा धुलसाडा (गोखाडी) सहभागी 
झाले होते.

*५)राष्ट्रीय कार्यशाळा : “भौगोलिक उपदर्शनी कायद्या अंतर्गत बौधिक संपदा विसेषतः 
वस्त्र आणि कलाकृती यांचे संरक्षण” या विषयावर दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यशाळा*– 
दिल्ली येथील कान्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया च्या सभागृहात ५ ते ६ मे रोजी 
“TEXTILES COMMITTEE” तर्फे आयोजित भौगोलिक उपदर्शनी विषयावर तसेच संबधित विविध 
तांत्रिक बाजू आणि विविध विषयवार मार्गदर्शन केले. आदिवासी समाजातील पारंपारिक 
ज्ञान आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन सशक्तीकरण चे प्रयत्न अधिक प्रभावी बनविण्य 
करिता या कार्यशाळेत आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनिल पऱ्हाड सहभागी झाले होते. 
कार्यशाळेचे उदघाटन वस्त्र मंत्रायलच्या केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी, 
केंद्रीय राज्य मंत्री अजय तमता, सचिव रश्मी वर्मा, अतिरिक्त सचिव पुष्पा 
सुब्रमणियन, विकास आयुक्त वस्त्र/हस्तकला अलोक कुमार, वस्त्र समिती सचिव अजित 
चव्हाण यांच्या उपस्थित कार्यशाळेची सुरवात झाली. या क्षेत्रातील विविध अनुभवी आणि 
तज्ञ यांचे विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन झाले.
प्रश्नोत्तर सेशन दरम्यान आयुश तर्फे पारंपरिक ज्ञान जतन करण्याची आवश्यकता आणि 
बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी चे आदिवासी युवकांचे प्रयत्न (वारली चित्रकलेचे 
भौगोलिक उपदर्शन नोंदणी) यांना शासनाचा उदासीन रिस्पॉन्स (शासनाची कोणतीही मदत 
नाही) मिळाल्याची खंत व्यक्त करून, अशा पारंपरिक ज्ञान जतन व रोजगार निर्मिती साठी 
शासकिय स्थरावर अधिक प्रभावी उपाय योजना आणि अंमलबजावणी होण्याची अपेक्षा मांडली.

कार्यशाळेत झालेले विषय
Technical Session I – Legal Framework & Registration Process
Technical Session II – Promotion and Marketing GI Products
Technical Session III – Quality Assurance of GI Marked Products
Technical Session IV – Raising Awareness and strengthening enforcements
Technical Session V – Activation of  Producer groups and take benefits of GI 
Registration

*६) महिला विशेष* -
परंपरागत आदिवासी समाज महिला सशक्तीकरण किंवा स्त्री पुरुष समानता या करिता आदर्श 
मानले जाते. पण सध्या बदलत चाललेल्या (इत्तारांचे अंधानुकरण) घडामोडी मुळे समाजात 
असलेले स्त्री चे महत्व या विषयी पुन्हा जागरूकता करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे 
आहे. सुयीन, सवासीन, धवलेरी, कऱ्हवली, इत्यादींचे सांस्कृतिक महत्व सोबत महिलांचा 
सामाजिक कार्यात सहभाग, आर्थिक सशक्तीकरण या साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत.
ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र 
काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या 
शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड, 
पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात 
रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० महिलांचा चा गट बनवून प्रायोगिक तत्वावर 
उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी, आपल्या 
संपर्कातल्या कलाकारांना कळवावे.

७) *सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प* -  सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर चित्र 
काढण्यासाठी चर्चा पूर्ण झाली प्रायोगिक तत्वावर २ नमुने संजय दा पऱ्हाड करत आहेत, 
त्यानुसार सविस्तर चर्चा करण्यात येईल. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कोईंबतूर, सुरत, 
पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या चित्रीकरणासाठी पाठवल्या जातील. 
ट्रस्ट ची टीम लवकरच डहाणू ला भेट देऊन पुढील औपचारीकता पूर्ण करतील.

८) *बेंगलोर येथील हॉटेल चेन ला वारली चित्र सजावट हवी आहे* -  प्राथमिक चर्चा 
चालू आहे, त्यांना त्यांच्या चेन मध्ये असलेल्या हॉटेल्स मध्ये वारली चित्र हवी 
आहेत. सध्या काही नमुना चित्रे पाठवली आहेत. यशस्वी झाल्यास एकत्रित चित्र 
बनविण्यासाठी काम उपलब्ध होईल

९) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*
वारली चित्र/आदिवासी कलाकृती विक्री साठी आपले स्वतःचे संकेत स्थळ आहेच 
(www.warli.in<http://www.warli.in> ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार 
आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-
Warli Painting<http://www.warli.in/>
www.warli.in
warli painting, India's global art proudly tribal art. we are tribal 
intellectuals here to share authentic and real information about warli art


(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स 
इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in<http://ciitrade.in>, Shilpakala.com, 
artsofindia.com<http://artsofindia.com>, 
greatindianbasket.com<http://greatindianbasket.com>, 
loveknits.org<http://loveknits.org>, indiakala.com<http://indiakala.com>, 
theartbazaar.in<http://theartbazaar.in>, BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त 
वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.
(आवश्यक निधी अभावी warlikala.com<http://warlikala.com> या ई कॉमर्स वेबसाईट चे 
नूतनीकरण न केल्याने सध्या बंद आहे.  )

*१०) आयुश संचय निधीसंकलन आणि सहकार्य* :
- आयुश ची डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC class ३) २ वर्ष मर्यादा बनविण्यासाठी 
अभिजित पिलेना यांनी आर्थिक सहकार्य केले
- वारली चित्र वस्तूंची माहिती B-B संबंध वाढविण्यासाठी इंडिया मार्ट वर सशुल्क १ 
महिन्याचे सभासदत्व साठी संजय दा पऱ्हाड यांनी सहकार्य केले
- मुंबई अंधेरी येथील कलाकार आणि वेबसाईट बनवणारे जाहिद शेख यांनी वारली 
चित्रकलेची वेब साईट डिझाईन करून देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. सध्या या  विषयी 
सविस्तर चर्चा चालू आहे
- टोरोंटो - कॅनडा येथून मंगेश मोकाशी जे बौद्धिक संपदा कायदा कंपनीत नोकरी करीत 
आहेत, त्यांनी विदेशात होणाऱ्या अनधिकृत वारली चित्रकला कलाकृती ना कायदेशीर नोटीस 
पाठविण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे, सविस्तर चर्चा करून पुढील दिशा 
ठरविण्यात येईल
- मुंबई येथून फ्री प्रेस मधून जानवी पाल या महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती जतन 
या विषयावर लेख लिहत आहेत त्यात वारली चित्र संस्कृती बद्दल प्रतिक्रियांसाठी 
मुलाखत घेतली

११) *सहकार्य आणि सहभाग*:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी 
होवू शकता. ओन लायीन : मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, नवीन आयडिया देणे, 
जाहिरात करणे
तांत्रिक सहकार्य : चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर करणे
उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शन, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून 
सहभागी होणे, उपक्रमाचे नेतृत्व करणे,
ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणे, युवाना मार्गदर्शन, संपर्क वाढवणे,
आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणे, वार्षिक/मासिक स्वरुपात आयुश संचय निधी 
मध्ये संकलन करणे, आर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे

*#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* :  
https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे 
(www.join.adiyuva.in<http://www.join.adiyuva.in>) नोंदणी करून सहभागी होवू शकता.

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक 
जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू शकेल. 
*"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच आयुश चा 
उद्देश आहे. समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेवून खारीचा वाटा उचलयची सवय ला 
प्रोत्साहन देवूया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ वृत्तीने समाजाच्या हिता 
साठी एकत्रित आणि पुरक प्रयत्न होत राहतील.

आपण पण आपल्या परिसरात असेच उप्रकम चालू करावे, किंवा असे विविध समाजोपयोगी उपक्रम 
आहेत त्यात सक्रीय सहभागी व्हा, किंवा किमान अशा उपक्रमांना पाठबळ द्या. *आपल्या 
उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि प्रामाणिक इच्छा!*

Lets do it together!
AYUSHonline team
www.adiyuva.in<http://www.adiyuva.in> | www.warli.in<http://www.warli.in> । 
०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge 
and cultural Intellectual of Adivasi community!
Aim of  this Initiative through Warli Painting
माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote 
Traditional knowledge through New technology
चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its 
sustainable economy by employment generation

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to 
adiyuva+unsubscr...@googlegroups.com<mailto:adiyuva+unsubscr...@googlegroups.com>.
To post to this group, send email to 
adiyuva@googlegroups.com<mailto:adiyuva@googlegroups.com>.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtcNqQVwvK63TwJ2L9cUe8iH2Vm%3DndSSJKxWdRjLYCv-g%40mail.gmail.com<https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtcNqQVwvK63TwJ2L9cUe8iH2Vm%3DndSSJKxWdRjLYCv-g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/BM1PR01MB04031020DC4B754A6556CF73C1F40%40BM1PR01MB0403.INDPRD01.PROD.OUTLOOK.COM.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to