*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जून २०१७ ||*



जोहार !

आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन
करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि
गेल्या हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन
जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या
उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !



हा एक प्रयोग आहे, आपण पण आपल्या परिसरात याहून अधिक उत्तम उपक्रम सुरु करावेत
किंवा अशे उपक्रम प्रभावी करण्याकरिता हातभार लावूया. *आपल्या
उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि प्रामाणिक इच्छा!*

या महिन्यातील काही घडामोडी आपल्या माहिती साठी उदाहरण म्हणून,



[अदिकला]

*१) CSR उपक्रम अंदाज पत्र* : भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम यांच्या मुंबई
येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक प्रस्थाव सादरीकरण बैठक मुंबईच्या
कार्यालयात झाली होती. सध्या प्राथमिक प्रस्तावावर चर्चा, सविस्तर नियोज, अंदाज
पत्र बनविणे चालू आहे. ऑगस्ट मध्ये पुढील उच्च स्थरीय बैठक होणार आहे त्यात
निर्णय होईल.



*२) वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी वारली चित्र* : मुंबई आणि बंगळुरू
येथील वेलिंगकर इन्स्टिटयूट मध्ये त्यांच्या पाहुण्या अधिकाऱ्यांना भेट
देण्यासाठी वारली चित्रांची मागणी संजय दा पऱ्हाड आणि सुभाष दा वनगा, धाकू दा
कडू, विजय दा वाडु, मंगेश दा कडू, सुभाष दा वनगा, निलेश दा , शिवराम दा
गोजरा  यांनी
पूर्ण केली



*३) सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प* - सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर चित्र
काढण्यासाठी चर्चा पूर्ण झाली प्रायोगिक तत्वावर २ नमुने संजय दा पऱ्हाड करत
आहेत, त्यानुसार सविस्तर चर्चा करण्यात येईल. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास
कोईंबतूर, सुरत, पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या
चित्रीकरणासाठी पाठवल्या जातील.

*या ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. आपल्या
संपर्कात गरजू असल्यास ३० जुलै पर्यंत सदर वेबसाईट वर अर्ज करण्यास सांगावे*  (
www.trustsuvas.org)



*४) संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्प महाराष्ट्र चे (United Nations Development
Programme, Maharashtra), कार्पोरेट कन्सल्टन्ट* गंधार देसाई यांनी संपर्क
केला होता, वारली चित्रकला संदर्भात पालघर मध्ये काही उपक्रम आराखडा
बनविण्याकरिता काही माहिती हवी होती. सदर विषयवार सविस्तर चर्चा करण्यात येणार
आहे.



*५) टेलिकॉम कंपनी तर्फे कलाकारांना वितरक म्हणून चौकशी* : रिलायन्स जीओ चे
नवीन प्रॉडक्ट्स ग्रामीण परिसरात वितरण आणि विस्तार व्हावा या साठी एक वेगळी
पद्धत अवलंबिण्यासाठी कलाकारांतर्फे वितरण व्हावे यासाठी कंपनीची तर्फे चौकशी
करण्यात आली होती. पण त्यांना अपेक्षित जन संपर्क ५ लाख पेक्षा जास्त असल्याने
चर्चा पुढे जाऊ शकली नाही.



*६) आगामी महिला विशेष उपक्रम* -

परंपरागत आदिवासी समाज महिला सशक्तीकरण करिता आदर्श मानले जाते. पण सध्या बदलत
चाललेल्या (इत्तारांचे अंधानुकरण) घडामोडी मुळे समाजात असलेले स्त्री चे महत्व
या विषयी पुन्हा जागरूकता करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुयीन, सवासीन,
धवलेरी, कऱ्हवली, इत्यादींचे सांस्कृतिक महत्व सोबत महिलांचा सामाजिक कार्यात
सहभाग, आर्थिक सशक्तीकरण या साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत.

ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र
काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या
शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड
, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि
त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० महिलांचा चा गट बनवून प्रायोगिक
तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी.




*७) इ-मार्केट मध्ये स्पर्धा करूया*

वारली चित्र/आदिवासी कलाकृती विक्री साठी आपले स्वतःचे संकेत स्थळ आहेच (
www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी
अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-



(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स
इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com,
greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in,
BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.

(आवश्यक निधी अभावी lagin.in आणि warlikala.com ई कॉमर्स वेबसाईट चे नूतनीकरण
न केल्याने सध्या बंद आहे.) -



*८) इत्तर काही* :

- मुंबई येथून फ्री प्रेस मधून जानवी पाल या महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती
जतन या विषयावर लेख लिहत आहेत त्यात वारली चित्र संस्कृती बद्दल
प्रतिक्रियांसाठी मुलाखत घेतली. हा लेख १९ जुलै रोजी प्रकाशीत होईल.

- मुंबई येथून मानस धुरू वारली पेंटिंग वर डॉक्युमेंट्री बनवत आहेत ते मुलाखती
साठी संपत दा ठाणकर आणि संजय दा पऱ्हाड यांच्या भेटीसाठी १५ व १६ जुलै ला
डहाणू येथे येत आहेत

- अहमदाबाद येथील आर्किटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थिनी धरती गज्जर वारली
चित्रकला आणि संस्कृती हा विषय घेऊन आर्किटेक्चर प्लान बनवत आहेत, पूर्ण
झाल्यावर महाराष्ट्र आणि गुजरात शासनाला सुचवणार आहेत. त्या लवकरच पुन्हा
डहाणू ला भेट देणार आहेत



[Most Urgent!!] *९) वारली पेंटिंग चे लोगो असलेल्या ट्रेड मार्क नोंदणी
विरोधात आक्षेप नोंदविणे*

नेदरल्यांड येथील फर्स्ट टेक्नॉलॉजि या कंपनीने वारली पेंटिंग असलेले दिवे या
साठी ट्रेडमार्क मुंबई येथील बौद्धिक संपदा विभागा तर्फे प्रकाशित जनरल मध्ये  सदर
प्रकरण प्रकाशित केले गेले आहे (५ जून २०१७), नियमा नुसार २ महिन्याच्या आत या
विषयी आक्षेप नोंदवू शकतो.



सदर कला आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा आहे, यावर कोणतीही
संस्था/कंपनी/व्यक्ती स्वामित्व मिळवू शकत नाही. वारली चित्रकलेचे बौद्धिक
संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये नोंद हि झालेली आहे. त्या साठी
आपण सदर कार्यालयात लीगल एक्स्पर्ट मार्फत आक्षेप नोंदविणार आहोत.



या विषयी शासकीय पातळीवर चर्चा व्हावी या साठी लेखी अर्ज १९ जून रोजी पाठवले
आहेत : राष्ट्रीय अनुसूचित जमाती अयोग चेअरमन, सदस्य, विभागीय कार्यालय,
महाराष्ट्र
राज्य राज्यपाल, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास सचिव महाराष्ट्र व गुजरात
, आदिवासी विकास कमिशनर, आदिवासी विकास अप्पर कमिशनर ठाणे, कमिशनर आदिवासी
संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र व गुजरात, प्रकल्प अधिकारी एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प डहाणू

- डहाणू प्रकल्प अधिकारी आंचल गोयल (IAS) यांच्याकडून १७ जून रोजी, पालघर
खासदार Adv. चिंतामण वनगा, डहाणू आमदार पास्कल धनारे, डहाणूचे माजी खासदार आणि
आमदार कॉ. लहानू सिडावा कोम (आदिवासी प्रगती मंडळ), जगन्नाथ कुवर (आदिवासी
वारली बहू उद्देशीय विकास संस्था) यांच्या कडून सपोर्टींग लेटर मिळाले.
(आपल्या संपर्कात असलेल्या जास्तीत जास्त आदिवासी संस्था कडून सदर पत्र द्यावे
)

- अहमदाबाद येथील ADV अटॉर्नी श्रुती शहा यांच्या मार्फत अर्जाचे ड्राफ्ट करून
आयुश तर्फे ट्रेडमार्क कार्यालयात सादर केले जाईल

- जव्हार येथील नामवंत ADV संदीप कुरकुटे हे अर्जाच्या ड्राफ्टिंग साठी
मार्गदर्शन करणार आहेत.



*१०) सहकार्य आणि सहभाग*:

सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने
सहभागी होवू शकता. ओन लायीन : मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, नवीन आयडिया
देणे, जाहिरात करणे

तांत्रिक सहकार्य : चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर करणे

उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शन, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून
सहभागी होणे, उपक्रमाचे नेतृत्व करणे,

ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणे, युवाना मार्गदर्शन, संपर्क वाढवणे,

आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणे, वार्षिक/मासिक स्वरुपात आयुश संचय
निधी मध्ये संकलन करणे, आर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे



*१२) वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन*

पहिल्यांदाच आयुश तर्फे काही आत्यंतिक महत्वाच्या उपक्रमासाठी आर्थिक
सहकार्याचे निवेदन केले होते. (१३ जुन २०१७)

- निधी प्राप्त : चेतन गुराडा (रु १५,०००), उमाशंकर भिमाजी चौधरी (रु २,५००)

- निधी अवाक : संजय पऱ्हाड, धाकू कडू, विजय वाडु, मंगेश कडू, सुभाष वनगा,
निलेश , शिवराम गोजरा (रु १०,२००)

- नॅसकॉम फौंडेशन / बिग टेक तर्फे आयुश ला अँटी व्हायरस सॉफ्टवेअर सावलीतच्या
दारात मिळाले

- भविष्यातील वारली पेंटिंग साठी इंटरनेट वरच्या ऍक्टिव्हिटी अधिक प्रभावी
बनविण्या करीत सेल्स फोर्स तर्फे NGO सपोर्ट मार्फत मोफत १० यूजर्स चे लायसन्स
मिळणार आहे, त्यासाठी नोंदणी केली आहे. (महिन्याची १५० डॉलर एका युसर ची फी
आहे). सेल्स फोर्स वर सयद होसन आठवड्यातून १० तास, शिकागो येथून अनिल सिंग
यांनी आठवड्यातून १० तास आयुश ला देण्याचे तयारी दर्शविली आहे.

- IPR एक्स्पर्ट मंगेश मोकाशी सध्या कॅनडात आहेत, आंतराष्ट्रीय पातळीवर
भौगोलिक उपदर्शनी चे पालन आणि त्यासाठी उपायोजना करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन
केले. त्यांच्या मार्गदर्शनाने आंतराष्ट्रीय उपक्रम नियोजन करणे आहे.



अधिक माहिती साठी काही लिंक्स -

* या उपक्रमाच्या अपडेट्स -
https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

* उपक्रमात सहभागी होण्या करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) नोंदणी
करावी



Towards constructive tribal empowerment, Lets do it together! | www.warli.in

संपर्क : ०९२४६ ३६१ २४९, ay...@adiyuva.in



Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional
knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of  this Initiative through Warli Painting

माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote
Traditional knowledge through New technology

चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its
sustainable economy by employment generation

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtT5UL_UCLPqpq3JgeiwSxuRXTFxHEHhuYTbUGgTfCLvQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to