।। आयुश उपक्रम उपडेट ८ मार्च २०१८ ।।



*१) जपानी अभ्यासकांची भेट* :

आदिवासी कला आणि संस्कृती जतन करण्यासोबत आर्थिक स्वावलंबन मजबुती करण्यासाठी
सुरु केलेल्या आदिवासी पर्यटन अंतर्गत जपान येथील २ अभ्यासक १७ मार्च रोजी
डहाणू येथे येत आहेत. त्यांना वारली चित्रकला विषयी अधिक जाणून घायचे आहे.
सुरवातीला २ दिवस ते राजस्थान येथे भेट देणार आहेत.



*२) फॅशन शो मध्ये वारली चित्रकला* :

इम्पलेमेंटेशन ऑफ आर्ट फॉर्म उपक्रमा अंतर्गत मुंबईतील सोफिया पॉलीटेकनिक
येथील विद्यार्थ्यांनी कल्पकता वापरून आकर्षक ड्रेस वर वारली डिझाईन वापरून
कपडे बनवले होते. संजय दा यांनी काढलेले चित्र असलेला ड्रेस ला द्वितीय
क्रमांक मिळाला



*३) बौद्धिक संपदा कायदा आणि भौगोलिक उपदर्शनी वार्कशॉप* :

२२ मार्च ला नागपूर येथे आयोजित अवेरनेस वर्कशॉप मध्ये सहभागी होण्यासाठी आयुश
निमंत्रण आले आहे. सहभाग घेऊन अनधिकृत वारली चित्रकला आणि व्यापारी उपयोग
(आदिवासींना डावलून परस्पर), विद्रुपीकरण, अपेक्षपार्ह जागी संस्कृती चित्र या
वर समाजाचे मत. साशकीय उपक्रमांतून अपेक्षा इत्यादी विषयी प्रेजेंटेशन देण्यात
येईल



*४) आदिवासी सांस्कृतिक महोत्सव मध्ये सहभाग* :

पुणे येथे आयोजित आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात कला प्रदर्शनात एकात्मिक
आदिवासी प्रकल्प डहाणू तर्फे ४ कलाकार सहभागी होत आहेत. वारली चित्रकला, लाकडाच्या
वस्तू, जूट च्या वस्तू, गवताच्या वस्तू इत्यादी विक्रीसाठी ठेवण्यात येतील.
पुण्य जवळील वाचकांनी जरूर भेट द्यावी



*आयोजक* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे

*दिवस* : १५ ते १९ एप्रिल २०१८

*ठिकाण* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे



*५) ट्रायबल युथ लीडरशिप प्रोग्रॅम मध्ये निवड* :

Tribal Youth Leadership Program - TYLP

पाचगणी येथे आयोजित आदिवासी युवा नेतृत्व विकासासाठी आयोजित प्रशिक्षण, देशभरातील
युवा आदिवासींशी संपर्क आणि अनुभवींकडून काही शिकण्यासाठी चांगली संधी आहे. या
प्रशिक्षणासाठी सचिन सातवी यांची निवड झाली आहे. येथे येणारे अनुभव आणि
प्रशिक्षण समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता उपयोगात आणले जातील.
सदर विषयात इच्छुकांनी जरूर सहभागी होऊन जे जे समाज हितासाठी चांगले शिकता
येईल ते शिकावे



*आयोजक* : टाटा स्टील csr (संवाद उपक्रम) मार्फत

*दिवस* : २२ ते २९ एप्रिल २०१८

*ठिकाण* : एशिया प्लेटू, पाचगणी, महाराष्ट्र

अर्ज करण्याची *शेवटची तारीख* : १२/३/२०१८ (
https://goo.gl/forms/Ms3EoarqGarNfip23)



*६) नेशनल कॉन्फेरंस ऑफ इंडिजिनियस युथ नेटवर्क ऑफ इंडिया मध्ये सहभाग* :

National Conference of Indigenous Youth Network of India - "Converging
Diversity into Integrity"

हैदराबाद येथे आयोजित तृतीय नेशनल कॉन्फरंस मध्ये विविध राज्यातून आदिवासी
युवा सहभाग घेणार आहेत. यात पुढील विषयावर सविस्तर मार्गदर्शन आणि चर्चा होणार
आहे. महाराष्ट्रातून इत्तर सहभागी सोबत आयुश तर्फे सचिन सातवी सहभाग घेत आहेत.
इच्छुकांनी जरूर सहभाग घेऊन, आदिवासी संपर्क वाढवून संघटन मजबूत करूया



१) आदिवासींचे संविधानिक अधिकार

२) विकासाचे पर्यायी मार्ग

३) राज्यांची परिस्थिती विषयी प्रेझेन्टेशन

४) संयुक्त राष्ट्र च्या UNPF & EMRI तयारी पूर्व बैठक

५) आदिवासी युवकांची एकता कशी वाढवावी



*आयोजक* :

Jharkhand Indigenous and Tribal People for Action (JITPA)

Indigenous Youth Network of India (IYNI)

*दिवस* : ७ ते ८ एप्रिल २०१८

*ठिकाण* : हैदराबाद, तेलंगणा

अर्ज करण्यासाठी :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfdr4JK24gJV9yOMXj42tCSjXWyAlQJ8MB9emVrrMzc_X3tHQ/viewform?c=0&w=1



*आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक उदाहरण
म्हणून लहानसा प्रयत्न आहे*. आपण पण आपल्या परिसरात  आवडीच्या क्षेत्रात
आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात *अधिक
प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets do it together!*



आयुश । आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/fb0203a489e8aa251461601a8c40d179%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to