I AM HAPPY TO YOUR SOCIAL WORK

2018-06-01 21:49 GMT+05:30 SACHiNe SATVi <wagh...@gmail.com>:

> वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया
>
> आज शेवटचा दिस कोरियाचा, उंद्या परत इयाचू ...
>
> [ *स्थानिक आदिवासी बोली भाषा* ]
> कव्हां भारतात येव ना घरा जावं असा झालाहें. गायचेन भलता आठव येय, घरचा धान
> खाया वाटलाहें. सामान गोलाटून बोचका बांधाया सुरवात केलीहे. हलूं हलू एक एक
> सामान नांगत होतुं, काही काही आठव येत होता डोक्यात. पका सामान झालाहे, दादूला
> बारका बारका पका सामान घिदेल आहे. त्याला हो खेलनी नीही पायजत, घरात ज्या
> सामान दिसल त्यासी खेलतो. इकडं दुकानात भलत्या बारक्या बारक्या क्रिएटिव्ह
> वस्तू दिसल्या, भलत्या भरून घितल्याहात.
>
> सामान त भरून नेवल, वस्तू नेवतील, आठवणी नेवतील, इकडचे फोटो नेवतील, वेग
> वेगल्या आयडिया नेवतील त्याचे आधारे भारताला सूचना करवतील. पण ये लोखांच्या
> चांगल्या सवई कस्याक आणू , का जेणेकरून भारतात हो लोखा बेस बेस रेहतीला.
>
> [ *साधारण मराठी भाषा* ]
> आज शेवटचा दिवस, उद्या भारताच्या प्रवासाला लागणार. काल संध्याकाळी ह्युंदाई
> कमर्शियल रिसर्च अँड डेव्हलोपमेंट चे डायरेक्टर सोबत डिनर झाला. आताच पॅकिंग
> पूर्ण झाली, दादू साठी खूप साऱ्या क्रिएटिव्ह वस्तू घेतल्या आहेत कारण त्याला
> खेळण्यांपेक्षा घरातल्या वस्तू आवडतात.
>
> कोरियात daiso नावाची दुकानांची चेन आहे, हि जपानी कंपनी आहे. या दुकानात
> घरात लागणारे सगळे लहान सहान वस्तू आणि सामान मिळते. डिझाईन, क्वालिटी खूप
> चांगल्या प्रतीची आणि किंमत पण परवडणारी. त्यामुळे या दुकानात नेहमी खूप गर्दी
> असते. आणि एकदा गेल्यावर, राहवतच नाही काही ना काही घेण्याची खूप इच्छा होते.
> कारण सगळ्या गोष्टी रोजच्या कामात येणाऱ्या आहेत. मनावर खूप ताबा ठेवला तरी
> मोठाली बॅग सामानानी भरली, तीनही वेळेस. असो येथे क्रिएटीव्हीटी वाढवणे आणि
> सामान्य जीवन सोप्प्या करणे याला खूप महत्व आहे. त्यानुसार सगळे डिझाईन केले
> जाते.
>
> कोरियाचे औद्योगिकरण, विकास, शहरीकरण, पर्यावरण, प्रसाशन, शिक्षण, जीवनशैली,
> परंपरा, जीवनमूल्य, इत्यादी अनेक गोष्टी जवळून बघतोय आणि अनुभवतोय गेल्या ११
> वर्षांपासून. कोरियन विकासाला रॅपिड ग्रोथ सांगतात, त्याचे त्या प्रमाणे फायदे
> आहेत आणि तोटे पण आहेत. पण येथील इन्फ्रा विकासा सोबत पूरक मूल्य व्यवस्था आणि
> नागरिकांचे आचरण तसेच प्रसाशनाची भूमिका पण महत्वाची आहे. येथील प्रशासक,
> नेतृत्व, उद्योजग, नोकरदार, व्यावसायिक, सामान्य नागरीक प्रत्येक जन त्यांचे
> काम नियमा नुसार प्रामाणिक करतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने
> मेंटेन आहेत. सार्वजनिक आणि वयक्तिक पण प्रत्येक जण जाबदारीने वापरतात. असो
> प्रत्येक गोष्टीच्या २ साईड असतात, इथल्या पण काही वाईट (न पटणाऱ्या) गोष्टी
> आहेत.  असो यांना हवे तशे त्यांच्या प्राथमिकतेने ते करत आहेत.
>
> आणि भारत म्हणून आपण? प्रत्येक जन वेग वेगळ्या दिशेने ओढायचा प्रयन्त करतोय,
> कुणीच समाधानी नाही.
> आपल्याना सर्वात आधी आपल्या *प्राथमिकता ठरावाव्या लागतील. एक बेस लाईन
> ठरवावी लागेल आणि त्यानुसार सुनियोजित पणे उपक्रम राबवावे लागतील. नाही तर खूप
> मोठा वर्ग विकासापासून दूर राहील आणि आर्थिक विषमता, असमानता, गुन्हेगारी वाढत
> राहील. पर्यावरण खराब होत राहील आणि नैसर्गिक आपत्ती, आजार, आरोग्याचे प्रश्न
> वाढत राहतील*.
>
> आपल्याना भौतिक गोष्टींवर जितके भर देतोय तितकाच भर आपल्या व्यवस्था प्रभावी
> करण्यात आणि लोकात संवेदना जागवणे महत्वाचे वाटते. कारण जरी सुपर फास्ट हायवे,
> प्रशस्त परिसर, यंत्र आले आणि ते *वापरण्यात शिस्त नसेल संवेदना नसेल तर अपघात
> आणि त्रासच जास्त होईल*. (सध्याचे अपघातांचे आकडे, प्रदूषणाचे, भ्रष्टाचाराचे,
> गुन्ह्यांचे, अत्याचाराचे आकडे बघावे)
>
> [ *दोन शब्द सामाजिक* ]
> विज्ञान वापरासाठी विवेक हवा. त्यासाठी आपल्यात मूल्य असायला हवीत, संस्कार
> असायला हवेत. काही चांगल्या गोष्टी पण होत आहेत पण दुर्दैवाने काही घडामोडी
> बघितल्यावर मन सुन्न होते.
>
> कुपोषित बालकांचा मृत्यू, आश्रम शाळेत विषबाधा/अत्याचार, वसतिगृहात
> भ्रष्ट्राचार, शिक्षणाची सुमार गुणवत्ता, महाविद्यालयात शिष्यवृत्ती नाही,
> अपुरी आरोग्य सेवा, योजना मधला अपहार, वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता,
> बोगसांचा भरणा, जमिनींचे हस्तांतरण, वाढती बेरोजगारी, वाढणारे बाहेरचे लोंढे,
> वाढणारी झोपडपट्टी, प्रदूषण, रोगराई, जमिनीची गुणवत्ता, अन्न पदार्थातील भेसळ,
> अमली पदार्थ आणि वाढते व्यसन, वाढती आर्थिक विषमता, भेदभाव, शेतकरी आणि
> कामगारांशी दुजाभाव, बुडते पारंपरिक उद्योग, इत्यादी *यादी वाढते आहे*.
>
> नक्की काय करतोय आपण? कोणत्या दिशेला जातो आहोत?
>
> भले प्राथमिकतेने बुलेट ट्रेन आणाल, ऑटोमॅटिक गाड्या आणाल, मोठे मोठे प्लांट
> लावाल, कारखाने काढाल, करोडो अब्ज मध्ये संपत्ती गोळा कराल. पण *जर सर्व
> सामान्यांचे जीवन अधिक सुखकर होणार नसेल तर नक्कीच हा विकास परवडणारा आहे असे
> वाटत नाही*.  तुम्हाला काय वाटते ?
>
> (या कोरियन लोकांची शिस्त आणि मूल्य बॅग मध्ये भरून आणता अली असती तर नक्कीच
> आणली असती)... असो खूप झाले, भेटूया भारतात आल्यावर.
>
> ........... dahanu calling!!!
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CAB4%3DxgZyM9FrXeJZdhUx6xTF-6oOdWNHdwYbHA4-SFZL4Fuy0A%
> 40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgZyM9FrXeJZdhUx6xTF-6oOdWNHdwYbHA4-SFZL4Fuy0A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAgR8ndfmzdK-RKx_s9mCHkqDddNGcrFQkM9JTeyEz2w-MdgiQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to