|| वैयक्तिक अनुभव : *संवाद/अपेक्षा/आकांक्षा* ||

▪️[स्थानिक आदिवासी भाषा : निहरी]
एकेक दिस मोजित रेहुं, बिहेत बिहेत जांव नां हलूचं विचारूं, सोडलां का लगेच
अर्ज लिहून देव ना घरां धांव घेंव. घरां जाण फुल चार्ज दसां होन परत सालत
होस्टेलला येंव, ना बीजे सुट्टेची वाट पाहुं. आथां हो भलता आठोव येय, *उंद्या
घरा जायाचूं रिचार्ज होया, दादूना कुल देव दाखवून, पाह्या पडाया नियाचां
आहे.*  वाघाडेतली हवा मिलली तऱ्ही भलतां बेस होय माना.

▪️[साधारण *मराठी भोली* भाषा]
दर वर्षीप्रमाणे ऑफिस मध्ये 'कल्चरल सर्वे' झाला. या सर्व्हेच्या माध्यमातून
कंपनीत काम करणाऱ्या *प्रत्येकाचे मत नोंदवून त्यानुसार आवश्यक असल्यास
स्ट्रॅटेजि/पॉलिसी/नियम सुधारले जातात.* कारण एकत्रित काम करताना कार्य
संस्कृती खूप महत्वाची आहे ज्या माध्यमातून विविध माणसांसोबत काम करणे सोप्पे
होते.

आमच्या कंपनीत जगभरातून अडीच लाखा पेक्षा जास्त माणसे काम करतात. प्रत्येकाचे
ठिकाण/भाषा/संस्कृती/धर्म/जेवण/कपडे वेग वेगळे, प्रत्येक ठिकाणी कामाची
वेळ/ऋतू/परिसर/नियम/पगार पण वेग वेगळा. तरीही सगळे जण एकत्रित काम करून कस्टमर
ला अपेक्षित गाडीचे डिझाईन, डेव्हलपटमेन्ट, मॅनुफॅक्चरिंग पूर्ण करून जगभरातील
विविध देशात गरजेनुसार त्या गाड्या वापरल्या जातात.

▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡
जर विद्यार्थी, युवक, नागरिक, शेतकरी, नोकरवर्ग, कामगार, व्यवसाय, इत्यादी
विविध फळीतील *आदिवासींच्या प्रत्येक्ष अपेक्षा/मागण्या/अडचणी नुसार स्वावलंबन
उद्देश ठेवून शासनाच्या आवश्यक योजना आराखडा बनवून प्रभावीपणे  राबवल्यास*
नक्कीच आदिवासी विकास विभागाचे बजेट योग्य पद्धतीने समाजाच्या कामी येईल.
(🔆शासन)

यासाठी *पॉलिसी मेकिंगसाठी आपण योग्य नेतृत्व/आवाज ला प्रोत्साहन/पाठबळ* देऊन
समाजासाठी प्रामाणिक काम करणाऱ्यांची फळी आणि कामाचे जाळे उभारायला हवे.
(🔆समाज)

यासाठी *नाव/झेंडा/नेता/डावा/उजवा याच्या पुढे जाऊन आपण एक कुटुंब हि भावना*
रुजवून सामाईक मुद्द्यांवर एकत्रित/पुरक काम करण्याची सवय महत्वाची वाटते.
(🔆वैयक्तिक)

बरोबर? कि तुमच्या कडे *अजून काही चांगला पर्याय असल्यास नक्कीच चर्चा
करूया.*🙏🏻 Let’s do it together! जोहार
..................................................................
💡आश्रम शाळांवर बारिक  लक्ष ठेवणे गरजेचे https://youtu.be/mRi0FFv9M94

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2LeMbroTjR3G9gwckwokgxMX-SpbaDMe3j3LJC2qFWVg%40mail.gmail.com.

Reply via email to