प्रसिद्धी पत्रक

कोंकणीतील जेश्ठ कार्यकर्ते श्री पंढरीनाथ शणै लोटलेकार स्मृतिदना निमीत्त कोंकणी 
भाषा मंडळ व कॅनपी आजूर यांनी चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले असून, हे प्रदर्शन आज 
(दि. 2 सप्टेंबर) रोजी कोंकणी भवन येथे सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.  कोंकणीतील 
जेश्ठ कार्यकर्ते डॉ. राजेंद्र हेगडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन 
करण्यात येईल. या वेळी मंडळाचे पदाधिकारी व लोटलेकार यांचे कुटूंबीय उपस्थित 
असतील. 

2 सप्टेंबर 2015 हे स्वर्गीय लोटलेकार यांचे शताब्दी वर्ष असून ह्या निमीत्त 
मंडळाने 30 ऑगस्ट रोजी एक चित्रकार्यशाळेचे आयोजन केले होते. कॅनपी आजुर ह्या 
संस्थेच्या संस्थापिका व स्वर्गीय लोटलेकार यांच्या कन्या इंदिरा पै आंगलो यांनी 
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुमारे 30 चित्रकारांनी या कार्यशाळेंत भाग 
घेतला. ह्याच चित्रकारांच्या कलाकृती आज प्रेक्षकांना अनुभवता येतील. 

स्वर्गीय पंढरीनाथ लोटलेकार यांचा जन्म 2 सप्टेंबर 1915 रोजी कळगुंट येथे झाला. 
लग्न झाल्यानंतर ते  मडगांव येथे स्थायीक झाले. ते वेवसायाने वकील होते व त्यांनी 
इस्क्रीवांव म्हणून नोकरी केली. राष्ट्रमत या वृत्तपत्रांत त्यांनी 'पौणी शणै' या 
नावाने समाजीक विशयावर लिखाण केले. आपल्या मायभाशेवर त्यांनी सदैव प्रेम केले. 
तिला हक्काची जागा मिळवून देण्यासाठी ते सदैव कार्यरत राहिले. कोंकणी भाषा मंडळ या 
संस्थेला  स्वताची हक्काची इमारत मिळावी म्हणून त्यांनी आपली जागा दान केली. 

1 नोव्हेंबर 2004 ह्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जन्मशताब्दी निमीत्त 
आयोजीत केलेल्या ह्या चित्रप्रदर्शनाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन 
आयोजकांनी केले आहे. 

 

Reply via email to