|| वयक्तिक : अर्जंट नाही पण *महत्वाचे* ||

▪️ [स्थानिक *आदिवासी बोली* भाषा]
तिसरी चवथी ला होतुं सालत, टीव्ही वर पिचराची नावां नांगुन नांगुन इंग्रजी
थोडां थोडां ओळखवत होतां. मी मनातले मनात भलतां भांव खाय, मन क्या बिहेत होवी
इंग्रजीला, लगेच तं सोप्पा आहे. आया माना धान दे - Aaya Mana Dhan De असां
लिहायचां. मंगा काही वारसा गेलीं ना माहित पडला तंव्हा भलता हसं मावरूच. 😅

▪️ [साधारण *मराठी*]
तिसरी - चौथी (१९९२-९३) ला असताना TV वरील नावे बघून बघून इंग्रजी नावे वाचता
येत होती. त्यामुळे मनातल्या मनात खूप भाव खायचो, आंबा लिहायचे असल्यास
"Aamba". पण जेव्हा खरच इंग्रजी शिकायला सुरवात केली तर चक्कर यायची,
डिप्लोमाला सुरवातीला अंदाजे ६ महिने पर्यंत वर्गात काय सुरु असायचे काही कळतच
नव्हते. नंतर हळू हळू कळू लागले. पण लक्षात आले कि समजणाऱ्या पहिल्या भाषेत
शिक्षण मिळाले तर त्याचा प्रभाव जास्त असतो आणि अनेक विद्यार्थी खूप चांगले
शिक्षण घेऊ शकतात. *एकट्या इंग्रजीमुळे अनेक हुशार/अभ्यासू आदिवासी विद्यार्थी
पुढे येऊ शकत नाही.* एक छान मुलाखत आहे नक्की ऐकावी-
https://youtu.be/9rplwgN6Xcc

▪️[ *दोन शब्द सामाजिक*]
नवीन NEP नुसार सविस्तर "आदिवासी शैक्षणिक धोरण" बनवून त्यानुसार
*नियोजनपूर्वक उपक्रम राबविण्यासाठी समाजात आणि शासकीय स्थरावर पण आवश्यक
जागरूकता करणे आवश्यक आहे.*

_आदिवासी बौद्धिक संपदा, पारंपरिक ज्ञान, संस्कृती, साहित्य, इतिहास, बोली
भाषा, सामाजिक दायित्व, सद्यस्थिती आणि अधिकार इत्यादी आवश्यक विषय
अभ्यासक्रमात आणले गेले पाहिजेत. जेणेकरून विद्यार्थ्यांत आदिवासीत्व सोबत
सामाजिक दायित्व ची संवेदना कायम राहील. आणि वयक्तिक करियर सोबत रचनात्मक
सामाजिक कार्याला हातभार लावतील._💡

उदाहरणासाठी सोनम वांगचुक यांनी तिबेट मध्ये खूप छान मॉडेल तयार केले आहे
"Students’ Educational and Cultural Movement of Ladakh" (SECMOL) या नावाने,
आणि जगभरातून त्यांचे कौतुक होते आहे. त्यांच्या मुलाखतींचा संग्रह या प्ले
लिस्ट वर बघता येईल, आरामात वेळ मिळेल तेव्हा बघावे.
https://youtube.com/playlist?list=PLeSyzPzZhp-1S7XvhZciO2ZlBpNyV1eJs

अशाच पद्धतीने नियोजनपूर्वक/रचनात्मक *सातत्याने शिक्षणावर काम करणाऱ्या अनेक
आदिवासी संस्था तयार झाल्या तर नक्कीच खूप चांगला प्रभाव समाजात पडू शकेल.*
(समाज हितासाठी कायमस्वरूपी उपाया मधील एक पर्याय). Lets do it together! जल
जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार!

.......................................................
नियम पाळा, काळजी घ्या, बेस रेहा ....

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2%2BWGvu3n3KZYi4Z7TLiM-jJUGDjaUnVJq5Z4BVA81NGw%40mail.gmail.com.

Reply via email to