आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात सध्या काम कमी अन् वेळ भरपूर कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून काय करणार सध्या बेंच वर आहे कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय भुला भटका missed call आता महाग झालाय forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो "आता कधी येशील?" असे आई रोज विचारते बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे खरच सारे काही गेलेय आता बदलून एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून कधीतरी तो दिवस येईल officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे Kamal More काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात कदाचित त्यालाच प्रेम म्हणतात. [email protected] [email protected] [email protected] http://kamalmore.blogspot.com/ ------------------------------ Add more friends to your messenger and enjoy! Invite them now.<http://in.rd.yahoo.com/tagline_messenger_6/*http://messenger.yahoo.com/invite/> ______________________________________________________________________ This email has been scanned by the MessageLabs Email Security System. For more information please visit http://www.messagelabs.com/email ______________________________________________________________________ --~--~---------~--~----~------------~-------~--~----~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ OWNER : [email protected]; [!! Sriram Savarkar ¡¡] MODERATOR : [email protected] { !! Âjay Nayak !! } MODERATOR : [email protected]>, "•–([NiCkkkDoN])–•" ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ You received this message because you are subscribed to the Google Groups "Sriram Savarkar" group. To modify your list subscription, please send a blank email to: For posting Messages: [email protected] Subscribe : [email protected] Unsubscribe : [email protected] Visit Group : http://groups.google.com/group/sriram-savarkar?hl=en -~----------~----~----~----~------~----~------~--~---
