---------- Forwarded message ----------
From: manjusha umrani <[email protected]>
Date: 2009/2/13
Subject: Fwd:
To: [email protected]


   हिंदु युवक-युवतींनो, `व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याच्या सापळयात अडकू नका !

 हिंदूंनो, `व्हॅलेंटाईन डे'सारखे राष्ट्र व धर्म यांवरील आक्रमण परतवून
लावा ! पाश्चात्त्य
जगतात `१४ फेब्रुवारी' हा दिवस `व्हॅलेंटाईन डे' म्हणून ओळखला जातो. या दिवशी
तरुण-तरुणी प्रेमाचे प्रतीक म्हणून एकमेकांना फुले व भेटवस्तू देतात. आता हे
खूळ हिंदुस्थानातही आले आहे. शत्रूराष्ट्राचे १० तरुण येऊन लाखो हिंदूंना भयभीत
करत असतांना आणि त्यांच्या तरुणीही हिंदुस्थानला कसे संपवता येईल, याचे
प्रशिक्षण घेत असतांना राष्ट्राचा आधारस्तंभ असणार्‍या तरुणपिढीने `व्हॅलेंटाईन
डे'च्या सापळयात का अडकावे ? ही युवाशक्‍ती राष्ट्र व धर्म रक्षणाच्या कामी
वळवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने केलेले विचारमंथन व कृतीसाठी केलेले
आवाहन....


** <http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20090213/pg2_img1_400.jpg>

*ख्रिस्ती संत (?) व्हॅलेंटाईनचा इतिहास
*तिसर्‍या शतकात रोमचा राजा क्लाऊडीयस (दुसरा) याने `तरुणांनी विवाह न करता
सैन्यात भरती व्हावे', असा आदेश काढला. या आदेशाला न जुमानता व्हॅलेंटाईन
नावाच्या धर्मगुरूंनी तरुण-तरुणींचे गुपचुप विवाह लावण्यास सुरुवात केली.
राजाने त्यांना कारावासात धाडले व फाशीची शिक्षा ठोठावली. कारावासात या कथित
संतांचे कारागृह अधिकार्‍याच्या तरुण मुलीशी प्रेम जुळले. फाशी जाण्याच्या
आदल्या दिवशी त्यांनी त्या मुलीला, `तुझ्याच व्हॅलेंटाईन कडून' अशी चिठ्ठी
पाठवली. अशा कथित ख्रिस्तीसंतांच्या स्मृती जागवून हिंदूंना कोणता लाभ होतो ?
पापी व्हॅलेंटाईन यांच्या स्मृती नीतीमान हिंदूंनी का जोपासायच्या ?

*कोणताही आध्यात्मिक लाभ करून न देणारा `व्हॅलेंटाईन डे' !
*पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून आलेले `व्हॅलेंटाईन डे'सारखे बहुतेक
`डे' चंगळवादावर आधारित असतात. त्यांचे अनुकरण केल्यास सभ्यता व नैतिकता यांचे
अवमूल्यन होऊन व्यक्‍तीची वृत्ती राजसिक-तामसिक बनते. याउलट हिंदु धर्मातील सण,
उत्सव इत्यादींच्या दिवशी ब्रह्मांडातून प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या
लहरींचा मानवाला लाभ होतो. हिंदु संस्कृतीतील सण, उत्सव, व्रते व धार्मिक कृती
आचरणात आणल्याने वृत्ती सात्त्विक बनून जीवन संयमी, सुखी व समाधानी बनते.
*
`व्हॅलेंटाईन डे'निमित्त होणारे हिंदूंचे वैचारिक व सांस्कृतिक धर्मांतर !
*`व्हॅलेंटाईन डे' (तथाकथित प्रेमदिन) साजरा करण्याच्या हिंदूंच्या आत्मघातकी
वृत्तीचा लाभ घेऊन आधुनिक प्रसारमाध्यमे व शुभेच्छापत्रे विकणारी काही आस्थापने
(कंपन्या) स्वार्थापोटी `व्हॅलेंटाईन डे'चा जोमाने प्रसार करतात. यामुळे
हिंदूंचे एकप्रकारे वैचारिक व सांस्कृतिक धर्मांतरच सुरू आहे.
*
संस्कृतीरक्षणासाठी नागरिकांना आवाहन !
*`व्हॅलेंटाईन डे' साजरा होऊ नये, यासाठी महाविद्यालयांत जाऊन प्राचार्य,
प्राध्यापक, संचालक मंडळ व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांना भेटून त्यांना
तरुणांचे प्रबोधन करण्यास सांगा !

 `व्हॅलेंटाईन डे' साजरा करू देण्यास मूकसंमती दर्शवणार्‍या महाविद्यालयांचा
दूरध्वनीद्वारे, समक्ष भेटून वा अन्य वैध मार्गाने निषेध नोंदवा !

 `व्हॅलेंटाईन डे' साजरा होऊ नये, म्हणून अशा प्रकारची पत्रके वाटा !

 आपल्या परिसरातील चौकांत अशा आशयाचे फलक प्रदर्शित करा !

 खाजगी शिकवणी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा !

 `व्हॅलेंटाईन डे'चा प्रसार करणार्‍या शुभेच्छापत्र कंपन्यांचा वैध मार्गाने
निषेध नोंदवा !

*पाश्चात्त्यांचा `व्हॅलेंटाईन डे' साजरा करू नका !
*पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून आलेले `व्हॅलेंटाईन डे'सारखे बहुतेक
`डे' चंगळवादावर आधारित असतात. त्यांचे अनुकरण म्हणजे सभ्यता व नैतिकता यांचे
अवमूल्यन आणि एका दिवसाचे वैचारिक व सांस्कृतिक धर्मांतर ! याउलट हिंदु
संस्कृतीतील संस्कार, सण, उत्सव, व्रते व धार्मिक कृती नित्यनेमाने आचरणात आणा
व वृत्ती सात्त्विक बनून जीवन संयमी, सुखी व समाधानी बनवा ! हिंदु संस्कृतीला
लागलेली `व्हॅलेंटाईन डे'रूपी कीड वेळीच काढून टाका व हिंदूंच्या भावी पिढीचे
सांस्कृतिकदृष्ट्या रक्षण करा !
<http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-02-13&action=fullnews&catid=3&id=16869>



   हिंदुस्तानमध्ये `व्हॅलेंटाईन डे'ला थारा का द्यावा ?

ख्रिस्तीधर्मगुरु समजले जाणारे `व्हॅलेंटाईन' हे देशविरोधी कारवायांमध्ये सामील
होते. त्यामुळे अशा व्यक्‍तीच्या नावाने `डे' साजरा करून काय साध्य होणार आहे.
`व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी तरुण-तरुणी पब, समुद्र किनारे, हॉटेल,
महाविद्यालये इत्यादी ठिकाणी एकत्र येतात व असभ्य वर्तन करतात. अशा वेळी
सर्वसामान्य व्यक्‍तीला या ठिकाणी जाणे कठीण होऊन बसते. काही नीतीमत्ताहीन
संघटना या दिवशी तरुण मुले व मुली एकत्र राहू शकतील, असे कार्यक्रम आयोजित
करतात.

शाळा-महाविद्यालयांतील तरुण विद्यार्थी या संस्कृतीचे बळी ठरतात व एकमेकाला
भेटकार्ड देऊन प्रेमाच्या आणाभाका देतात. त्यात प्रेम नसते, तर ते लैंगिक
आकर्षण असते. `व्हॅलेंटाईन डे'ला लग्नाची मागणी घालणार्‍या अनेकांवर अखेर
मनोरुग्ण होण्याची वेळ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. `व्हॅलेंटाईन डे'चा तरुण
पिढीच्या भवितव्यावर विपरीत परिणाम झाला आहे. `व्हॅलेंटाईन डे'ला सामाजिक
अस्थिरतेचे बीज रोवले जाते व नीतीमत्ता खालावल्याने समाजामध्ये अस्थिरता वाढते.
बाहेरच्या शत्रूने केलेला हल्ला आपण परतवून लावू शकतो; मात्र संस्कृतीवरील
आक्रमण ओळखणे खूप कठीण असते व पुढे आपण त्यापासून स्वत:चे रक्षण करू शकत नाही.
सांस्कृतिक घसरण समाजाला विनाशाकडे नेत असते व तेच आपण सध्या भारतात अनुभवत
आहे.
अनेक पाश्चिमात्य राष्ट्रे `व्हॅलेंटाईन डे' साजरा करत नाही. १९६९ मध्ये तयार
करण्यात आलेल्या रोमन कॅथॉलिकक संताच्या कॅलेंडरमधून `व्हॅलेंटाईन डे' वगळण्यात
आला होता. तेव्हा हिंदुस्तानमध्ये तरी या दिवसाला थारा का द्यावा ?



-- 
Sriram Savarkar (c)
Hinduism is more a way of life than a method of worship.
Dharmo Rakshati Rakshithaha
If you protect Dharma, Dharma will in turn protect you.
Hindus, If people slap you once, slap them twice!

--~--~---------~--~----~------------~-------~--~----~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
OWNER              : [email protected]; [!! Sriram Savarkar ¡¡]   
MODERATOR      : [email protected]                { !! Âjay Nayak !! }
MODERATOR      : [email protected]>,    "•–([NiCkkkDoN])–•" 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"Sriram Savarkar" group.

To modify your list subscription, please send a blank email to:
For posting Messages: [email protected]
Subscribe               : [email protected]
Unsubscribe     : [email protected]
Visit Group     : http://groups.google.com/group/sriram-savarkar?hl=en
-~----------~----~----~----~------~----~------~--~---

Reply via email to