|| माहितीसाठी:*अखेर NCST चा हस्तक्षेप*||
_आज महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीलाही निवेदन देण्यात आले._ ..................................................... "आयुश वारली चित्रकला क्लस्टर" चे प्रकल्प कार्यालयातर्फे *अयोग्य पद्धतीने मूल्यांकन* करून, *ठरवून नकारात्मक अहवाल* बनविल्याचे आयुश टीम चे मत आहे. यासंबंधी MoU नुसार गठीत मॉनिटरींग समितीच्या बैठकीसाठी *अनेक निवेदने करूनही प्रतिसाद मिळाला नाही.* योजनेत गैरव्यवहार झाला आहे, उपक्रम स्थगित करुन निधीची वसुली करावी अशी प्रकल्पातर्फे *एकतर्फी पद्धतीने नोटीस मिळाली होती.* हे *अन्यायकारक असून आदिवासी विकास विभागाला अनेक निवेदने/विनंतीला अजून प्रतिसाद मिळाला नाही.* अंतिम पर्याय म्हणून NCST येथे तक्रार नोंदवली. *NCST कडून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना १५ दिवसात माहिती पाठविण्यासाठी सूचना देण्यात आली आहे.* (आयुश ला पत्राची प्रत मिळाली) अपेक्षा आहे आदिवासी विकास विभागात आदिवासी संस्था म्हणून जाणीवपूर्वक खच्चीकरण होऊ नये. जास्तीत जास्त *आदिवासी संस्थांचे सबळीकरण व्हावे, पाठबळ मिळावे.* स्पष्ट आणि आग्रही मत आहे कि आदिवासी विभागाचा *ज्या गोष्टींसाठी निधी आहे त्याच साठी प्रामाणिकपणे उपयोगात* यायला हवा. ...................................................... आयुश उपक्रम/या योजने विषयी समाजाचा भाग म्हणून काहीही चुकत/दुरुस्ती असल्यास हक्काने लक्षात आणून द्यावे🙏🏻, *आयुश सोशिअल ऑडिट साठी सदैव खुले आहे. आपले ज्ञान/कौशल्य/ऊर्जा आदिवासी समाज हितासाठी सातत्याने कामात यावे हा उद्देश.* अधिक सविस्तर येथे - https://bit.ly/3oV3fLy सामाजिक उद्यमीतेतून *आदिवासीत्व जतन करत उभे राहिलेले उपक्रम सशक्त करूया,* Lets do it together! जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार! ___________________________________ आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम [समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना] .groups.google.com/g/adiyuva -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2xFzXu6wFkXBDjFMEZ6k7uJO5D-B6c%2Bv%3D65fTQpZnvWw%40mail.gmail.com.